पॅरिस - फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) स्टार खेळाडू नेमार घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात परत येणार आहे. एका वृत्तानुसार, नेमार जानेवारीत फुटबॉल सामना खेळणार आहे. १३ डिसेंबर रोजी फ्रान्स फुटबॉल लीगमध्ये लिओनविरुद्ध झालेल्या सामन्यात नेमार जखमी झाला होता.
हेही वाचा - अर्जेंटिनामधील स्टेडियमला मॅराडोना यांचे नाव
थेओगो मेंडिस याच्याशी झालेल्या धडकीमुळे नेमारला घोट्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर नेमारला स्ट्रेचरवर नेण्यात आले. मेंडिसला रेफरीने रेड कार्ड दिले होते. त्या सामन्यात लिओनने पीएसजीचा १-० असा पराभव केला. लिओनने २००७-०८ मध्ये पीएसजीविरुद्ध विजय मिळवला होता. त्याच वर्षी त्यांनी लीग -१ विजेतेपद जिंकले होते.
फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स लीगच्या अंतिम -१६ मध्ये बार्सिलोनाविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी नेमार पूर्ण तंदुरुस्त होईल, असे क्लबने म्हटले आहे. नेमार ऑगस्ट २०१७ मध्ये बार्सिलोनाला सोडून पीएसजीत दाखल झाला. त्याने पीएसजी क्लबला सलग तीन लीग-१ विजेतेपद जिंकण्यास मदत केली आहे. याखेरीज, संघाने मागील मोसमातील चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तेथे त्यांना बायर्न म्युनिककडून पराभवाला सामोरे जावे लागले.