बर्लिन - स्टार फुटबॉलपटू नेमार पॅरिस सेंट जर्मेन क्लबसोबत (पीएसजी) कायम राहणार आहे. त्याने या संदर्भात सांगितलं की, त्याचा पॅरिस सेंट जर्मेन क्लबशी नवा करार जवळपास निश्चित आहे.
डीपीएच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार २०१७ मध्ये बर्सिलोना क्लब सोडून पीएसजीसोबत जोडला गेला होता. परंतु काही दिवसांपासून नेमार पीएसजी क्लब सोडून रियल माद्रिदशी करार करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत होत्या. पण नेमारच्या स्पष्टीकरणानंतर या बातम्यात तथ्य नसल्याचे समोर येत आहे.
नेमार म्हणाला की, 'पीएसजीसोबत आमचे बोलणे सुरू आहे. यात कोणतीही घाई करण्याची आवश्यकता नाही. सर्व काही ठरलेलं आहे. पीएसजी मला घरासारख वाटतं. मी पीएसजीसोबत खुश आहे.'
दरम्यान, पीएसजी क्लबसोबत जोडला गेल्यापासून नेमार बहुतांश काळ दुखापतीने त्रस्त राहिला आहे. त्याचा लवकरच पीएसजीसोबतचा करार संपणार आहे. पण त्याने पुढे देखील पीएसजीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. नेमारने लीग १ मध्ये १४ सामन्यात ६ गोल आणि ३ असिस्ट केले आहेत.
हेही वाचा - झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक
हेही वाचा - AFC चॅम्पियन लीगमध्ये एफसी गोवाने ऐतिहासिक विजयाची संधी गमावली