ETV Bharat / sports

क्रिकेट नव्हे, तर फुटबॉलला धर्म मानणारे गाव...

पूर्णिया शहरापासून तीन कि.मी.अंतरावर उत्तरेकडील टोकाला वसलेले हे झील टोला गाव खर्‍या नावाने ओळखण्याऐवजी 'मिनी ब्राझील' म्हणून ओळखले जाते. बिहारमधील हे गाव केवळ फिट इंडिया चळवळीला बळकट न करता भविष्यासाठी फुटबॉलपटूची फौज देण्यासाठी सज्ज आहे. सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक बहुतांश आदिवासी समाजातील आहेत. फुटबॉल हा फक्त एक खेळ नव्हे त्यांच्यासाठी धर्म आहे. विकासाच्या सावलीपासून दूर या भागात सुमारे १५० कच्ची आणि पक्की घरे आहेत. या गावात फक्त तरुण नव्हे तर, वयस्कांनाही फुटबॉलची आवड आहे.

mini-brazil-village-situated-on-the-northern-left-of-purnia-city-from-where-many-football-players-came-out
क्रिकेट नव्हे तर फुटबॉलला धर्म मानणारे गाव...
author img

By

Published : Jan 18, 2021, 8:04 PM IST

पूर्णिया - जेव्हा फुटबॉलची चर्चा होते, तेव्हा सर्वांच्या डोक्यात फुटबॉलवेडा ब्राझील देश उभा राहतो. असाच फुटबॉलवेडा 'मिनी ब्राझील' भारतातील बिहार राज्यात पाहायला मिळतो. या राज्यात पूर्णियातील झील टोला नावाच्या छोट्याशा गावात क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळ प्रसिद्ध आहे. भारतात क्रिकेटची पूजा होत असली तरी या गावामध्ये फुटबॉल हा धर्म मानला जातो. या गावातील लोक सचिन तेंडुलकरला नव्हे तर ब्राझीलच्या पेलेला आपला देव मानतात.

मिनी ब्राझील

'मिनी ब्राझील'

पूर्णिया शहरापासून तीन कि.मी.अंतरावर उत्तरेकडील टोकाला वसलेले हे झील टोला गाव खर्‍या नावाने ओळखण्याऐवजी 'मिनी ब्राझील' म्हणून ओळखले जाते. बिहारमधील हे गाव केवळ फिट इंडिया चळवळीला बळकट न करता भविष्यासाठी फुटबॉलपटूची फौज देण्यासाठी सज्ज आहे. सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक बहुतांश आदिवासी समाजातील आहेत. फुटबॉल हा फक्त एक खेळ नव्हे त्यांच्यासाठी धर्म आहे. विकासाच्या सावलीपासून दूर या भागात सुमारे १५० कच्ची आणि पक्की घरे आहेत. या गावात फक्त तरुण नव्हे तर, वयस्कांनाही फुटबॉलची आवड आहे.

mini-brazil-village-situated-on-the-northern-left-of-purnia-city-from-where-many-football-players-came-out
मिनी ब्राझील

दुसरे म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागांप्रमाणेच येथेही टीव्ही आहेत. परंतु चित्रपट किंवा मालिकेऐवजी झील टोलाच्या प्रत्येक घरात फुटबॉल लीगचे सामने पाहिले जातात. मग ते युरोपियन लीग असो किंवा एफएसएल. गप्पाटप्पा आणि खेळांमध्ये आपला वेळ घालवण्याऐवजी मुले, वयस्क झील टोला मैदानावर फुटबॉल खेळायला किंवा पाहण्यासाठी गर्दी करतात.

स्थानिक फुटबॉलपटू सांगतात की, तरुण आणि मुलांची दिनचर्या सकाळी फुटबॉल खेळण्यापासून सुरू होते. संध्याकाळी फुटबॉलचा सराव करून या गावातील लोकांचा दिवस संपतो. या गावाची चर्चा ऐकून सिपाही टोला येथील एक फुटबॉलप्रेमी नेहमी झील टोला गावात फुटबॉल खेळण्यासाठी येतो. या फुटबॉलपटूची उत्सुकता पाहून त्याला एक संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत तो चार वर्षांपासून स्थानीय संघात खेळत आहे. अनेक राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धेत तो खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सय्यद अब्दुस समद

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सय्यद अब्दुस समद हे पूर्णिया जिल्हा शाळेचे विद्यार्थी होते. त्यांनी या झील टोला मैदानातून बाहेर पडत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या आहेत. समद यांच्या कारनाम्यानंतर फुटबॉल हा या गावाचा महत्त्वाचा खेळ बनला. आदिवासी तरुण अब्दुस समद यांना आपला नायक मानतात. या गावात राहणाऱ्या प्रत्येक फुटबॉलपटूसाठी समद देवापेक्षा कमी नाहीत. अब्दुल समद यांच्यासारखे नाव कमावून देशासाठी खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. फुटबॉलचे वातावरण कायम राहण्यासाठी या मिनी ब्राझीलचा संघ सरना फुटबॉल क्लब ३८ वर्षांपासून १ ते १५ ऑगस्टदरम्यान भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करतो. या स्पर्धेत देशातील अनेक संघ सहभागी होतात. इतकेच नव्हे तर नेपाळच्या सीमेवरील संघही यात भाग घेतात.

१९८०मध्ये सरना फुटबॉल क्लबची स्थापना

जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रशिक्षक रजनीश पांडे सांगतात की, फुटबॉलची क्रेझ पाहता, गावातील लोकांनी ११९८०च्या दशकात सरना फुटबॉल क्लबची स्थापना केली. आर्थिक आव्हानांशी झुंज देऊनही या आदिवासी वस्तीतून एकापेक्षा सरस फुटबॉलपटू उदयास आले. अशा खेळाडूंपैकी एक होते प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सय्यद अब्दुस समद. या फुटबॉलपटूंच्या नावावर एक क्लब तयार करण्यात आला. या क्लबमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश होता.

अब्दुल लतीस, नेपू दा, बीएन गांगुली, मो सोब आलम आणि पदम सिन्हा या नामांकित फुटबॉलपटूंचा या क्लबमध्ये समावेश होता. गेल्या ४० वर्षात 'मिनी ब्राझील'ने फुटबॉलपटूंची सेना तयार केली आहे. हे खेळाडू अंडर १९, अंडर १७, अंडर १४ सोबत राष्ट्रीय संघातही खेळले आहेत. अंडर १९ बिहार संघाचा दोन वेळचा कर्णधार सरबर अली हा या गावात आला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या गावातील अनेक खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा सन्मान प्रदान केले आहेत. या आदिवासी गावातील खेळाडूंनी क्रिकेट मैदानाच्या धर्तीवर जिल्ह्यात फुटबॉलसाठी अधिक चांगले मैदान तयार करावे, अशी शासनाला विनंती केली आहे.

हेही वाचा - ... आज बाबा इथे असायला हवे होते - मोहम्मद सिराज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.