चंदीगड - लॉकडाऊनच्या कालावधीत रक्तपेढींची पूर्तता करण्यासाठी मिनेर्वा अकादमीच्या 15 सदस्यांनी ब्लड बँक सोसायटीला रक्तदान केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेऊन हे रक्तदान करण्यात आल्याचे अकादमीने म्हटले.
अकादमीचे मालक रंजीत बजाज म्हणाले, ''रक्तदान हे मानवतेसाठी केलेले सर्वात मोठे योगदान मानले जाते. आम्हाला अशा कठीण परिस्थितीत समाजाला जशी येईल तशी मदत करण्याची इच्छा आहे. अशा योगदानामुळे आपण हे अंतर कमी करू शकतो.''
बजाज पुढे म्हणाले, "आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोना व्हायरसने रक्तदानावर परिणाम केला आहे. नॅशनल ब्लड ट्रांसफ्यूजन काऊन्सिल (एनबीटीसी) स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक सदस्याने बंदीच्या कालावधीत सर्व नियमांचे पालन करून रक्तदान करावे."