लंडन - प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर इल्की गुंडोगन याला कोरोनाची लागण झाली आहे. एका वृत्तानुसार, क्लबने रविवारी याची पुष्टी केली. २९ वर्षीय गुंडोगन आता १० दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत आहे. ऑगस्टमध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता.
गुंडोगन हा जर्मनीचा फुटबॉलपटू असून तो इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीकडून खेळतो. कोरोनाच्या संसर्गामुळे तो सोमवारी व्हॉल्वोसविरुद्ध होणाऱ्या मोसमातील त्याच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही.
''क्लबमधील प्रत्येक सदस्य इल्कीला लवकरात लवकर बरो होण्यासाठी शुभेच्छा देतो", असे मँचेस्टर सिटीने म्हटले आहे. यापूर्वी, मँचेस्टर सिटीचा रियाद महारेझ आणि इमरिक लापोर्टे यांनाही कोरोनासंसर्ग झाल्याचे आढळले आहे.