मँचेस्टर - लिसेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडचा पराभव करत इंग्लिश प्रिमियर लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मँचेस्टर सिटीने मागील १० वर्षांत पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात लिसेस्टर सिटीने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना मँचेस्टर युनायटेडला २-१ ने पराभव केला.
मँचेस्टर सिटीच्या संघाला शनिवारी झालेल्या चेल्सी विरुद्धच्या सामन्यात १-२ असा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीला जेतेपदासाठी प्रतिक्षेत राहण्याची वेळ आली. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आणि पेप गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखाली लिसेस्टर सिटीने पाचव्यांदा बाजी मारली.
-
Morning, champs! 💙
— Manchester City (@ManCity) May 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔷 #ManCity | https://t.co/axa0klD5re pic.twitter.com/7vW0Lq8CVH
">Morning, champs! 💙
— Manchester City (@ManCity) May 12, 2021
🔷 #ManCity | https://t.co/axa0klD5re pic.twitter.com/7vW0Lq8CVHMorning, champs! 💙
— Manchester City (@ManCity) May 12, 2021
🔷 #ManCity | https://t.co/axa0klD5re pic.twitter.com/7vW0Lq8CVH
एका रिपोर्टनुसार, मँचेस्टर युनायटेडने रविवार एस्टन विला क्लबचा पराभव केला होता. त्यांना विजेतपदासाठी आणखी एका विजयाची गरज होती. परंतु, १० बदलांसह उतरलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिसेस्टर सिटीने पराभव केला.
लिसेस्टर सिटीच्या ल्यूक थॉमसने १०व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. तेव्हा युनायटेडच्या मेसन ग्रीनवूडने १५व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. सिटीच्या केगलर सोयोन्कुने ६६व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सिटीने ही आघाडी कायम ठेवली आणि विजेतेपद पटकावले.
मँचेस्टर सिटी शुक्रवारी न्यू कॅसल विरुद्ध सामना खेळणार आहे. २३ मे रोजी ते लीगमधील अंतिम सामना खेळतील. त्यानंतर २९ मे रोजी चेल्सीविरुद्ध ते चॅम्पियन लीगमधील अंतिम सामना खेळणार आहेत.
हेही वाचा - झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक
हेही वाचा - पीएसजी क्लबसोबत राहणार, नेमारची स्पष्टोक्ती