ETV Bharat / sports

मँचेस्टर सिटीला २.३२ अब्ज रुपयांचा दंड!

author img

By

Published : Feb 15, 2020, 6:12 PM IST

'क्लबच्या वतीने सर्व पुराव्यांचा विचार केल्यानंतर, मँचेस्टर सिटीने आपल्या खात्यातील प्रायोजकत्व महसूल योग्य दाखवला नाही. त्यामुळे क्लब परवाना आणि आर्थिक फेअर प्ले नियमांचे उल्लंघन झाले आहे', असे यूईएफएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Manchester City banned from the Champions League for two years
मँचेस्टर सिटीला २.३२ अब्ज रूपयांचा दंड!

लंडन - इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर सिटीला यूईएफएने पुढील दोन हंगामांकरिता आर्थिक नियमांच्या गंभीर उल्लंघनामुळे युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. या बंदीव्यतिरिक्त मँचेस्टर सिटीला ३० दशलक्ष युरो म्हणजेच २.३२ अब्ज रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा - थायलंडवर सरशी.. भारताची एशियन टीम चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक

'क्लबच्या वतीने सर्व पुराव्यांचा विचार केल्यानंतर, मँचेस्टर सिटीने आपल्या खात्यातील प्रायोजकत्व महसूल योग्य दाखवला नाही. त्यामुळे क्लब परवाना आणि आर्थिक फेअर प्ले नियमांचे उल्लंघन झाले आहे. शिवाय क्लबने या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य केले नाही', असे यूईएफएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

'चेंबरने मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबला पुढील दोन हंगामांमध्ये (२०२०/२१ आणि २०२१/२२ ) क्लब स्पर्धांमध्ये भाग घेऊ न देण्याचे निर्देश दिले. त्या व्यतिरिक्त ३० दशलक्ष युरोंचा दंडही भरावा लागेल', असेही असोसिएशनने म्हटले आहे.

मँचेस्टर सिटी युएईएफएच्या निर्णयाविरोधात ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (स्पोर्ट्स आर्बिट्रेशन) मध्ये अपील करू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.