ETV Bharat / sports

तब्बल ७५३ सामन्यानंतर मेस्सीसोबत घडली 'ही' घटना

author img

By

Published : Jan 18, 2021, 4:49 PM IST

एका वृत्तानुसार, रविवारी झालेल्या सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मेस्सीने अ‍ॅथलेटिक क्लबचा खेळाडू एशियर व्हॅलालिब्रेविरूद्ध चुकीचे वर्तन केले. त्यामुळे त्याला लाल कार्ड मिळाले. बार्सिलोनाचा खेळाडू म्हणून हे मेस्सीचे पहिले लाल कार्ड आहे. या क्लबसाठी त्याने ७५३ सामने खेळले आहेत.

Lionel Messi sees first red card in Barcelona career
तब्बल ७५३ सामन्यानंतर मेस्सीसोबत घडली 'ही' घटना

नवी दिल्ली - स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचा फुटबॉलपटू म्हणून लिओनेल मेस्सीला प्रथमच आपल्या क्लब कारकिर्दीत लाल कार्ड मिळाले आहे. स्पॅनिश सुपर कप फायनलमध्ये बार्सिलोनाला अ‍ॅथलेटिक क्लबकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मेस्सीने चुकीचे वर्तन केले.

एका वृत्तानुसार, रविवारी झालेल्या सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मेस्सीने अ‍ॅथलेटिक क्लबचा खेळाडू एशियर व्हॅलालिब्रेविरूद्ध चुकीचे वर्तन केले. त्यामुळे त्याला लाल कार्ड मिळाले. बार्सिलोनाचा खेळाडू म्हणून हे मेस्सीचे पहिले लाल कार्ड आहे. या क्लबसाठी त्याने ७५३ सामने खेळले आहेत.

हेही वाचा - मैदान मै मौत डाल दिया मियाँ!...गाबात सिराज चमकला

४०व्या मिनिटाला अँन्टोईन ग्रिझ्मनने गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर ओस्कर डी मार्कोसने गोल करून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर ग्रिझ्मनने ७० व्या मिनिटाला आणखी एक गोल करून बार्सिलोनाला पुन्हा एकदा आधार दिला. ९०व्या मिनिटाला एसिअर व्हिलालिब्रे आणि तीन मिनिटानंतर इनाकी विल्यम्सने गोल करत अथलेटिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लिओनेल मेस्सीकडून 'पेले' सर!

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ब्राझीलचे दिग्गज माजी फुटबॉलपटू पेले यांचा सर्वाधिक गोलचा (क्लबकडून खेळतानाचा) विक्रम मोडित काढला. काही दिवसांपूर्वी वॅलाडॉलिड संघाविरुद्ध गोल करत बार्सिलोनाच्या मेस्सीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बार्सिलोनासाठी ६४४ पेक्षा जास्त गोल नोंदवत एखाद्या क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे. पेले यांनी क्लब सांतोसकडून खेळताना ६४३ गोल केले होते. १९७४मध्ये पेले यांनी सांतोससाठी शेवटचा सामना खेळला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.