पॅरिस - फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने एका क्लब सामन्यात खेळताना मोठा विक्रम नोंदवला. त्याने आपला क्लब पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) साठी १००वा गोल नोंदवला. मॉन्टपेलियरविरूद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
हेही वाचा - माझ्याऐवजी नटराजन हा खरा सामनावीर - हार्दिक पांड्या
पीएसजीने मॉन्टपेलियरला ३-१ असे हरवले. या सामन्यात एम्बाप्पेने हा ऐतिहासिक गोल नोंदवला. २१ वर्षीय एम्बाप्पेने १३७ सामन्यात हा पराक्रम केला आहे. २०१७पासून तो या क्लबबरोबर खेळत आहे. आता क्लबसाठी सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानावर त्याच्यासोबत डोमिनिक रोचेन आहे. त्याने २५५ सामन्यात आपले शतक पूर्ण केले.
उरुग्वेचा फुटबॉलपटू एडिसन कवानी २०० गोलसह अव्वल स्थानावर आहे. स्वीडनचा दिग्गज खेळाडू झ्लाटान इब्राहिमोविच १५६ गोलांसह दुसऱ्या स्थानावर आहे.