फर्तोडा (गोवा) - आयएसएल २०२१ मध्ये एकमेव हॅट्ट्रिक झळकावणाऱ्या बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग फुटबॉलचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबई सिटीने एटीके मोहन बागानचा २-१ असा पराभव करत पहिल्यावहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
-
We had #NeetuKapoor & co-owner #BimalParekh joining the #TheIslanders trophy celebration at the Fatorda! ☺️#MCFCATKMB #HeroISLFinal #TrophyLekeAa 🏆 #MCFChamp1ons #AamchiCity 🔵 pic.twitter.com/zmzARLMDCO
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) March 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We had #NeetuKapoor & co-owner #BimalParekh joining the #TheIslanders trophy celebration at the Fatorda! ☺️#MCFCATKMB #HeroISLFinal #TrophyLekeAa 🏆 #MCFChamp1ons #AamchiCity 🔵 pic.twitter.com/zmzARLMDCO
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) March 14, 2021We had #NeetuKapoor & co-owner #BimalParekh joining the #TheIslanders trophy celebration at the Fatorda! ☺️#MCFCATKMB #HeroISLFinal #TrophyLekeAa 🏆 #MCFChamp1ons #AamchiCity 🔵 pic.twitter.com/zmzARLMDCO
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) March 14, 2021
फतोर्डा स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात डेव्हिड विल्यम्सने १८व्या मिनिटाला गोल करत मोहन बागानला १-० ने आघाडी मिळवून दिली. पण २९व्या मिनिटाला टिरी याच्या स्वयंगोलमुळे मुंबई सिटीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. टिरीने हेडरद्वारे चेंडूला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण गोलरक्षक पुढे आल्याने चेंडू सरळ गोलजाळ्यात गेला.
पहिला हाफ १-१ अशा बरोबरीत सुटला. पण सामन्याच्या ९०व्या मिनिटाला चेंडू अडवण्याच्या नादात मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य पुढे आला. पण गोलजाळ्याच्या जवळ असलेल्या बार्थोलोमेऊ ओगबेचे याने चेंडूवर नियंत्रण राखत तो बिपीनकडे सोपवला. त्यानंतर बिपीनने कोणतीही चूक न करता शानदार गोल केला. मुंबई सिटीने याच गोलच्या जोरावर पहिले विजेतेपद पटकावले.
हेही वाचा - चॅम्पियन्स लीग : मेस्सी-नेमार एकमेकांसमोर उभे ठाकणार
हेही वाचा - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण