नवी दिल्ली - जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाला मात देण्यासाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी आपला निधी गरजू लोकांपर्यंत पोहोचवला आहे. दरम्यान भारतीय फुटबॉलपटूंनी आपले योगदान दिले.
भारतीय संघाचा बचावपटू प्रीतम कोटल याने पश्चिम बंगाल रिलीफ फंडामध्ये ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, हलदरनेही मुख्यमंत्री मदत निधीला २० हजार रुपये दिले आहेत. हलदरसह खेळणार्या प्रबीर दासनेही ५० हजार रुपयांची मदत दिली आहे.
अनुभवी गोलकीपर अरिंदम भट्टाचार्यनेही २५ हजार रुपयांची देणगी दिली आहे.