ETV Bharat / sports

8 ऑक्टोबरला रंगणार भारत विरूद्ध कतार पात्रता सामना - india vs qatar football match news

कतार व्यतिरिक्त भारतीय संघ 12 नोव्हेंबरला यजमान बांगलादेश आणि त्यानंतर 17 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना खेळेल. एशियन फुटबॉल महासंघाने (एएफसी) फिफाशी चर्चा केल्यानंतर फिफा वर्ल्ड कप 2022 पात्रता स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या आहेत.

India to host qatar in world cup qualifier on october 8
8 ऑक्टोबरला रंगणार भारत विरूद्ध कतार पात्रता सामना
author img

By

Published : Jun 6, 2020, 6:34 PM IST

नवी दिल्ली - फिफा वर्ल्ड कप 2022 च्या पात्रता गटात भारतीय पुरुष फुटबॉल संघ कतारविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना 26 मार्चला भुवनेश्वर येथे होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला. आता 8 ऑक्टोबरला हा सामना होईल.

कतार व्यतिरिक्त भारतीय संघ 12 नोव्हेंबरला यजमान बांगलादेश आणि त्यानंतर 17 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना खेळेल. एशियन फुटबॉल महासंघाने (एएफसी) फिफाशी चर्चा केल्यानंतर फिफा वर्ल्ड कप 2022 पात्रता स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या आहेत.

फिफा वर्ल्ड कप 2022 च्या गट - ईमध्ये पाच सामन्यांमध्ये तीन गुणांसह भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पाच संघांच्या तक्त्यात बांगलादेशचा संघ सर्वात खाली आहे.

डिलिव्हरी अँड लीगेसी अँड कतार फाऊंडेशनच्या सर्वोच्च समितीने 2022च्या फिफा वर्ल्ड कप कतारसाठी तिसर्‍या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले. ही घोषणा शनिवारी करण्यात आली. या समितीच्या मते, हे स्टेडियम एज्युकेशन सिटीमध्ये आहे आणि वेळापत्रकानुसार बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. एज्युकेशन सिटीमधील पूर्ण होणारे हे कतारमधील तिसरे स्टेडियम आहे. यापूर्वी 2017 मध्ये खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि 2019 मध्ये अल जानोब स्टेडियमचे काम पूर्ण झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.