ETV Bharat / sports

कोरोनाची फुटबॉलला 'किक', आय-लीगसह देशातील सर्व स्पर्धा स्थगित - कोरोनामुळे आय-लीग स्थगित न्यूज

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) शनिवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. 'एआयएफएफ लोकांच्या आरोग्याचे आणि जीवनाचे महत्त्व समजून घेत आहे आणि एआयएफएफ कधीही यावर कोणतीही तडजोड करणार नाही', असे एआयएफएफने म्हटले आहे.

I-League postponed to 31 March due to Corona virus
कोरोनाची फुटबॉलला 'किक', आय-लीगसह देशातील सर्व स्पर्धा स्थगित
author img

By

Published : Mar 15, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - देशभरात फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे आय-लीग सामन्यांसह इतर सर्व फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - आयपीएलबाबत 'दादा'चे मोठे वक्तव्य, म्हणाला...

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) शनिवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. 'एआयएफएफ लोकांच्या आरोग्याचे आणि जीवनाचे महत्त्व समजून घेत आहे आणि एआयएफएफ कधीही यावर कोणतीही तडजोड करणार नाही. एआयएफएफ आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यातील परिस्थितीचा आढावा घेईल आणि त्यानंतर संबंधित संस्थांशी बोलणी करून या संदर्भात निर्णय घेईल', असे एआयएफएफने म्हटले आहे.

त्याशिवाय हीरो सेकंड डिव्हिजन, हीरो यूथ लीग, गोल्डन बेबी लीग आणि इतर सर्व राष्ट्रीय स्पर्धा तातडीने प्रभावीपणे निलंबित करण्यात आल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत राज्यात कोणतेही क्रीडा उपक्रम आयोजित केले जाणार नाहीत, अशी पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.