लास व्हेगस - फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो एका मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये बलात्कार केल्याप्रकरणी एका युवतीने रोनाल्डोवर आरोप लावला होता. या युवतीने सादर केलेल्या पुराव्याशी रोनाल्डोचा डीएनए जुळला असल्याचे पुढे आले आहे. या व्यतिरिक्त रोनाल्डोने संबंधित युवतीला ईमेल केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीने दिला नदीमला गुरूमंत्र, फोटो व्हायरल
३४ वर्षीय रोनाल्डोला त्याच्यावर कोणताही फौजदारी आरोप लावला जाणार नाही, असे जुलैमध्ये सांगण्यात आले होते. ३४ वर्षीय मॉडेल कॅथरीन मेयरगा हिने २००९ मध्ये लास व्हेगस येथील एका हॉटेलच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रोनाल्डोवर केला होता.
त्यानंतर, जानेवारी २०१० मध्ये मेयरगा हिने ही गोष्ट जाहीर न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती आणि रोनाल्डोविरूद्ध तोडगा स्वीकारल्याबद्दल खटला चालण्यास नकार दिला. मात्र, मी-टूच्या अभियानामुळे तिने या प्रकरणासंबंधी आवाज उठवण्याचे ठरवले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून तिने आपल्यासोबत झालेली घटना जगासमोर मांडली. रोनाल्डोने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.