ETV Bharat / sports

बार्सिलोनाला नेमारने ५७ कोटी द्यावेत!..न्यायालयाचा आदेश - neymar to pay barcelona

बार्सिलोना सोडून नेमार 2017 मध्ये पीएसजीमध्ये सामील झाला आणि त्यासाठी त्याने 22.2 दशलक्ष युरोच्या जागतिक विक्रमाच्या मानधनावर स्वाक्षरी केली. 43.6 दशलक्षच्या लॉयल्टी बोनसच्या देयकासाठी त्याने बार्सिलोनाविरूद्ध दावा दाखल केला.

footballer neymar ordered to pay 6.7 million euros to barcelona
बार्सिलोनाला नेमारने ५७ कोटी द्यावेत!..न्यायालयाचा आदेश
author img

By

Published : Jun 20, 2020, 5:41 PM IST

बार्सिलोना - पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारला न्यायालयाने मोठा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने नेमारला त्याचा माजी क्लब एफसी बार्सिलोनाला 6.7 दशलक्ष युरो (57,13,15,700 रुपये) देण्याचे आदेश दिले. न भरलेल्या स्वाक्षरी बोनससंदर्भातील प्रकरण हरल्यानंतर नेमारला हा आदेश देण्यात आला.

बार्सिलोना सोडून नेमार 2017 मध्ये पीएसजीमध्ये सामील झाला आणि त्यासाठी त्याने 22.2 दशलक्ष युरोच्या जागतिक विक्रमाच्या मानधनावर स्वाक्षरी केली. 43.6 दशलक्षच्या लॉयल्टी बोनसच्या देयकासाठी त्याने बार्सिलोनाविरूद्ध दावा दाखल केला.

बार्सिलोनाने नेमारवर कराराचा भंग केल्याचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने क्लबच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने घेतलेल्या नेमारसंबंधित निर्णयावर बार्सिलोनाने समाधान व्यक्त केले आहे.

नेमारची कोरोनाग्रस्तांना मदत -

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने कोरोनाग्रस्तासाठी 7 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्याने ही रक्कम युनिसेफला दिली. यातून ब्राझिलमधील पीडितांना मदत करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.