नवी दिल्ली - अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना आपल्या ६०व्या वाढदिवसाच्या अवघ्या एका आठवड्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. मॅराडोना यांच्यावर ब्रेन हॅमरेजमुळे शस्त्रक्रिया करावी लागली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
मॅरेडोनाचे न्यूरोसर्जन म्हणाले, "आम्ही क्रॉनिक सबड्युरल हेमेटोमा यशस्वीरित्या काढून टाकण्यात यशस्वी झालो आहोत. शस्त्रक्रियेच्या वेळी दिएगोने परिस्थितीचा सामना केला. ते आता ठीक आहेत."
मॅराडोना सध्या जिम्नॅशिया वाय एग्रीगामा या स्थानिक क्लबचे प्रशिक्षक आहेत. १९८६मध्ये मॅराडोना यांचा अर्जेंटिना संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा होता. मॅराडोना यांना त्यांच्या विलक्षणजीवनशैलीमुळे आयुष्यात बर्याच वेळा रुग्णालयात जावे लागले.
पोटाच्या अंतर्गत रक्तस्त्रावमुळे मॅराडोना यांना जानेवारी २०१९मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी, ते रशियामध्ये झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान आजारी पडले होते. तेथे ते अर्जेंटिना-नायजेरिया सामना पाहण्यासाठी गेले होते.