माद्रिद - स्पॅनिश लीग ला-लीगा क्लब बार्सिलोनाचे पाच खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मे महिन्यात लीगने क्लबच्या खेळाडूंची चाचणी केली होती. या खेळाडूंची आणि कर्मचार्यांची नावे समोर आलेली नाहीत.
यापूर्वी, लीगने सर्व क्लब संघांना संघासह सराव करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, ला-लीगाने पहिल्या दोन फेऱ्यांच्या तारखा जाहीर केल्या. 11 जूनला सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेविला आणि रिअल बेटिस आमनेसामने असतील. तर, 13 जूनला बार्सिलोनाचा संघ रियल मॅलोर्काविरुद्ध उभा ठाकेल. कोरोनामुळे ही लीग मार्चमध्ये तहकूब करण्यात आली होती.
16 जूनला बार्सिलोना लेगनेसचे आयोजन करेल. तर 18 जूनला रिअल माद्रिद आणि वॉलेन्शिया संघात सामना होईल. बार्सिलोनाचा संघ सध्या 58 गुणांसह टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रिअल मेडिडचा संघ 56 गुणांसह दुसर्या तर, सेविला 47 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
एका वृत्तानुसार, सर्व लीग सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील. रिअलचा संघ उर्वरित सहा सामने घरच्या मैदानावर खेळणार आहेत.