फार्तोडा (गोवा) - इंडियन सुपर लीग क्लब गोवाने, एएफसी चॅम्पियन लीगमध्ये ऐतिहासिक विजयाची संधी गमावली. एफसी गोवाचा साखळी फेरीत कतारच्या अल रेयान क्लब विरुद्धचा पाचवा सामना १-१ ने बरोबरीत राहिला.
सोमवार रात्री जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या ग्रुप ई च्या या सामन्यात जॉर्ज ओर्टिज याने तिसऱ्या मिनिटाला गोलं करत गोवाला १-० ने आघाडी मिळवून दिली होती.
यजमान संघाने ही आघाडी अखेरच्या क्षणापर्यंत कायम राखली. पण सामन्याच्या ८९व्या मिनिटाला अली फरीदून याने शानदार गोल करत अल रेयान संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
दरम्यान, या स्पर्धेच्या गुणतालिकेत एफसी गोवा तीन गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर अल रेयानचा संघ दोन गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा - झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक
हेही वाचा - मुंबई सिटीने बिपीन सिंहसोबतचा करार वाढवला