मुंबई - जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या हॉटेल्सचे रुपांतर रुग्णालयात करणार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. तेव्हा रोनाल्डोच्या समाजसेवेचे कौतूक जगभरातून होऊ लागले. फुटबॉल सामन्यांचे वार्तांकन करणाऱ्या जगभरातील अनेक संकेतस्थळांनी यासंदर्भातलं वृत्त दिले होते. स्पॅनिश वृत्तपत्र मार्सामध्येही याबद्दलची माहिती होती. पण आता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.
रोनाल्डोची PESTANA CR७ नावाने पोर्तुगालमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. यातील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याने सांगितलं की, 'आम्ही हॉटेल चालवतो आहे. त्याचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी रोजच्यासारखाच आहे आणि हे हॉटेलच राहणार आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या संदर्भात आम्हाला अनेक मीडिया प्रतिनिधींचे फोन आले असल्याचेही त्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
काय आहे प्रकरण -
कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी रोनाल्डो पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सचे रुपांतर रुग्णालयात करणार आहे. एवढेच नव्हे, तर येथे उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा पगारही रोनाल्डो स्वतःच्या खिशातून करणार आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे, वृत्त अनेक संकेतस्थळानी दिले होते. मात्र, हे वृत्त रोनाल्डोच्या हॉटेल कर्मचाऱ्याने फेटाळून लावले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, जगभरात कोरोनाचा फैलाव वाऱ्यासारखा होत आहे. या विषाणूने १०० हून अधिक देश ग्रासले आहेत. तर ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोर्तुगालमध्ये २०० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली
हेही वाचा - इटलीच्या ११ फूटबॉलपटूंना कोरोनाची लागण