ग्लासगो - यूरो कप २०२० स्पर्धेत सोमवारी दोन अप्रतिम गोल पाहायला मिळाले. या गोलपैकी एक गोल तर युरो चषकाच्या इतिहासातील अप्रतिम गोल्सपैकी एक ठरला. कारण हा गोल चक्क मैदानाच्या मध्यातून झाल्याने, याची चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.
चेक प्रजासत्ताक आणि स्कॉटलंड यांच्यात सोमवारी सामना पार पडला. या सामन्यात चेक प्रजासत्ताकने स्कॉटलंडवर २-० ने विजय मिळवला. हे दोन्ही गोल चेकचा फॉरवर्ड प्लेयर पॅट्रिक शिक याने केले. सामन्यातील ४२ व्या मिनिटाला शिकने व्लादिमिर कुफॉलच्या क्रॉसवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर दुसरा हाफमध्ये चेककडून ७ मिनिटाच्या आतच शिकने अद्भुत गोल करत संघाला २-० ची आघाडी मिळवून दिली.
४५ मीटर दूरवरुन लगावला गोल
सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला शिकने मैदानाच्या मध्यावरुन उंच शॉट मारत गोल करण्याचा प्रयत्न केला. स्कॉटलंडचा गोलकिपरही काहीसा पुढे आला होता. त्यामुळे त्याला बॉलपर्यंत पोहचणे अशक्य झाले आणि बॉल थेट गोलपोस्टमध्ये शिरला. शिकने हा गोल गोलपोस्टपासून सुमारे ४५ मीटरच्या अंतरावरुन दागला होता. हा गोल पाहिल्यानंतर सर्वचजण हैरान झाले या गोलचा व्हिडीओही सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
-
This angle of Schick’s goal is mad.. 🤯
— 𝙊𝙨𝙘𝙖𝙧 🇸🇪 (@UtdOscarinho) June 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
pic.twitter.com/TXbUa70Nb3
">This angle of Schick’s goal is mad.. 🤯
— 𝙊𝙨𝙘𝙖𝙧 🇸🇪 (@UtdOscarinho) June 14, 2021
pic.twitter.com/TXbUa70Nb3This angle of Schick’s goal is mad.. 🤯
— 𝙊𝙨𝙘𝙖𝙧 🇸🇪 (@UtdOscarinho) June 14, 2021
pic.twitter.com/TXbUa70Nb3
हेही वाचा - मँचेस्टर सिटीने १०वर्षांत पटकावलं ५व्यांदा प्रीमियर लीगचे विजेतेपद
हेही वाचा - रियल माद्रिदचा मिडफील्डर टोनी क्रूसला कोरोनाची लागण