लंडन - इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 17 जूनपासून पुन्हा सुरू होईल. पहिला सामना अॅस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायटेड आणि दुसरा सामना मँचेस्टर सिटी आणि अर्सेनल यांच्यात होईल. एक वृत्तसंस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जेव्हा ही स्पर्धा थांबवण्यात आली तेव्हा या संघांतील सामने खेळले जाणार होते. वृत्तानुसार, संपूर्ण वेळापत्रक यादी 19-21 जूनला समोर येईल.
प्रीमियर लीगने बुधवारी आपल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षणाला मंजूरी दिली आहे. मार्चच्या मध्यापासून देशभरात फुटबॉल बंद आहे, परंतु अलीकडेच संघांनी छोट्या गटात सराव करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, ईपीएलच्या टीम फुलहॅममधील दोन खेळाडू कोरोनाने संक्रमित असल्याचे आढळले आहे. याविषयी क्लबने केवळ गुरुवारी माहिती दिली. सोमवार ते बुधवार या कालावधीत एकूण 1030 खेळाडू व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या.