लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगने (ईपीएल) आपल्या नवीन वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ईपीएलने शुक्रवारी ही माहिती दिली. कोरोनाव्हायरसमुळे मार्चच्या मध्यभागी लीग थांबवण्यात आली होती. मात्र आता 17 जूनला लीगला सुरूवात होणार आहे.
लीगचा पहिला सामना अॅस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायटेडशी होईल. याच दिवशी संध्याकाळी मँचेस्टर सिटी आणि आर्सेनलचा संघ एकमेकांशी भिडतील. मँचेस्टर युनायटेडचा सामना 19 जूनला टोटेनहॅम हॉटस्परशी होईल. 25 गुणांसह अव्वल असलेला लिव्हरपूलचा संघ 21 जूनला एव्हर्टनशी टक्कर देईल. त्यानंतर 24 जूनला लिव्हरपूल क्रिस्टल पॅलेसविरूद्ध खेळेल. 2 जुलैला मॅन्चेस्टर सिटीविरूद्धही लिव्हरपूलचा संघ मैदानात उभा ठाकणार आहे.
ईपीएलने नुकत्याच तीन फेऱ्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून 17 जून ते 2 जुलै या कालावधीत रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय हे सलग सामने खेळले जातील. ईपीएलचे मुख्य कार्यकारी रिचर्ड मास्टर्स म्हणाले, "आपण ब्रॉडकास्टरच्या माध्यमातून आम्ही घरी बसून लाईव्ह सामना पाहू शकतो."
या सामन्यादरम्यान पाच बदली खेळाडू खेळवता येतील असे यापूर्वीच सांगितले गेले आहे.