लिस्बन - पोर्तुगाल स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याचा मॅनेजर जॉर्ज मेंडिस कोरेनाविरूद्धच्या लढाईत हातभार लावण्यासाठी मेडीरा आरोग्य विभागाला पाच व्हेंटिलेटर देणार आहेत. लुसा वृत्तसंस्थेने शनिवारी ही माहिती दिली. एका अहवालानुसार, मेडिरा विभागाकडे आता व्हेंटिलेटर्सची संख्या ९९ अशी झाली आहे.
पोर्तुगालच्या आरोग्य संचालनालयाच्या अहवालानुसार, आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसचे ९०२ रुग्ण आढळले आहेत, तर जवळपास १०० लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे सध्या जग भयभीत झाले असून अनेकजण या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. या व्हायरसला तोंड देण्यासाठी रोनाल्डोसह अनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ५० लाख, सुरेश रैनाने ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.