हैदराबाद - इंडियन सुपर लीग (आयएसएल) ची सुरूवात पुढील महिन्यात गोवामध्ये होणार आहे. पण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच सात खेळाडूंसह एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
-
How it started ✨#OnThisDay in 2014, the inaugural #HeroISL edition kicked off at a packed Salt Lake Stadium! pic.twitter.com/cO7f5Yzq42
— Indian Super League (@IndSuperLeague) October 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">How it started ✨#OnThisDay in 2014, the inaugural #HeroISL edition kicked off at a packed Salt Lake Stadium! pic.twitter.com/cO7f5Yzq42
— Indian Super League (@IndSuperLeague) October 12, 2020How it started ✨#OnThisDay in 2014, the inaugural #HeroISL edition kicked off at a packed Salt Lake Stadium! pic.twitter.com/cO7f5Yzq42
— Indian Super League (@IndSuperLeague) October 12, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसएल स्पर्धेसाठी गोवामध्ये दाखल झालेल्या सर्व संघातील खेळाडू आणि स्टाप सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात सात खेळाडूंसह एक सहाय्यक प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती.
कोणत्या संघातील खेळाडूंना लागण झाली आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इतर खेळाडूंना व स्टाप सदस्यांना बायो बबलमध्ये पाठवण्यात आलं आहे. याशिवाय जे बाधित झाले आहेत त्यांना वेगळे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, या हंगामासाठी कोलकाता फ्रेंचायझी ईस्ट बंगालला इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) स्थान मिळाले आहे. आयएसएलमध्ये प्रवेश करणारा ईस्ट बंगाल एफसी आता ११वा संघ ठरला आहे. २०२०-२१मध्ये हा संघ आपला पदार्पणाचा सामना खेळेल. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) अध्यक्ष नीता अंबानी यांनी या क्लबचे आयएसएलमध्ये स्वागत केले आहे. अद्याप ईस्ट बंगालचा संघ गोव्यामध्ये दाखल झालेला नाही.
हेही वाचा - रॉबर्ट लेवांडोव्स्की ठरला वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
हेही वाचा - लिव्हरपूलच्या फुटबॉलपटूला कोरोनाची लागण
हेही वाचा - इंडियन सुपर लीगमध्ये नवा संघ दाखल