मिलान - एकीकडे लिओनेल मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’चा पुरस्कार पटकावला तर, दुसरीकडे जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सेरी-ए प्लेयर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - आयपीएलच्या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी केली नोंदणी!
एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री येथे झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोला या गौरविण्यात आले. जुवेंटसच्या पदार्पणाच्या मोसमात रोनाल्डोने २६ गोल केले आहेत. त्याने ३१ सामन्यांत २१ गोल केले असून अव्वल गोल नोंदवणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या मोसमात त्याने ११ सामन्यांत ६ गोल केले आहेत.
साम्पडोरिया स्ट्रायकर फॅबिओ क्वाग्लिरेला 'गोल्डन बूट' पुरस्काराने गौरविण्यात आले. पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँड्सच्या व्हर्जिन व्हॅन डिज्जाकला मागे पछाडत मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’चा (Ballon d'Or) पुरस्कार जिंकला आहे. रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. तर, मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ मध्ये आणि यंदाचा पुरस्कार पटकावला आहे.