असुनिसन - ब्राझिलियन फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ रोबटेरे एसीस यांनी बनावट पासपोर्ट प्रकणानंतर केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ यांना दुसरी रात्रही तुरुंगात घालवावी लागली.
हेही वाचा - T२० World Cup Final : एलिसा हिलीने जे पुरुषाला जमलं नाही असा कारनामा केला
३९ वर्षीय रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ बनावट पासपोर्टसह पॅराग्वेमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. शुक्रवारी असुनसिऑनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये २४ तासांपेक्षा जास्त वेळ पोलिसांच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर, या दोघांनाही एका कैद्यासह पोलिस कोठडीत पाठविण्यात आले.
त्यानंतर या दोघांना शनिवारी न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले असता, क्लारा रुईझ डायझ न्यायाधीशांनी पोलिसांचा तपास सुरू होईपर्यंत त्यांना तुरूंगात ठेवण्याचे आदेश दिले. 'त्यांनी केलेला गुन्हा हा पराग्वे राज्याविरूद्ध एक गंभीर गुन्हा आहे', असे स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीशांनी आपल्या निकालात असे म्हटले आहे.