लंडन - इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) क्लब बोर्नमाउथचा गोलकीपर आरोन रामस्डेलला कोरोनाची लागण झाली आहे. प्रीमियर लीगमध्ये कोरोनाची लागण झालेला 22 वर्षीय रामस्डेल हा दुसरा खेळाडू आहे.
रामस्डेल अगोदर वॉटफोर्डच्या अॅड्रियन मारियाप्पाला कोरोनाची लागण झाली होती. रामस्डेल म्हणाला, "मला पूर्ण धक्का बसला आहे. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही तरीही मला लागण झाली.''
तो पुढे म्हणाला, "जे माझ्या बाबतीत घडले ते वाईट आहे. परंतू कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. माझ्याबरोबर दुर्दैवाने घडलेल्या गोष्टींपैकी ही एक घटना आहे." यापूर्वी प्रीमियर लीग होणार होती. गेल्या आठवड्यात जवळपास 996 खेळाडू आणि क्लबच्या कर्मचार्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. यापैकी दोन क्लबमधील दोघे जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
मंगळवारपासून प्रीमियर लीगमधील संघांना छोट्या गटात सराव करण्याची परवानगी देण्यात आली. कोरोनामुळे लीग 13 मार्चपासून पुढे ढकलण्यात आली आहे.