तुरीन - चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटस संघाला अजॅक्सकडून पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह चॅम्पियन्स लीगमधील युव्हेंटस आव्हानही संपुष्टात आले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये अजॅक्सने युव्हेंटसचा २-१ असा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या लेगमध्ये अजॅक्स आणि युव्हेंटसचा सामना १-१ असे बरोबरीत सुटला होता. मात्र दुसऱ्या लेगमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाल्याने युव्हेंटसचा चॅम्पियन्स लीगमधील या सत्राचा प्रवास ईथेच संपला आहे.
-
💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr
">💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr
या सामन्यात युव्हेंटसकडून रोनाल्डोला २८ व्या मिनीटाला एकमेव गोल करता आला. तर अजॅक्सकडून ३४ व्या मिनिटाला डॉनी व्हॅन डे बीकने पहिला तर मॅथिग्स डी’लेटने ६४व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
चॅम्पियन्स लीगचा पहिला उपांत्य फेरीचा सामना अजॅक्स आणि टॉटेनहॅमशी यांच्यात तर दुसरा सामना बार्सिलोना आणि लिव्हरपूल यांच्यात होईल.