ETV Bharat / sports

ऐतिहासिक!..तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना

गुरूवारी तेहरान आझादी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या इराण विरूद्ध कंबोडिया सामन्यात इराणने दमदार विजय मिळवला. इराणने कंबोडियाला १४-० ने मात दिली आहे.

ऐतिहासिक!..तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना
author img

By

Published : Oct 11, 2019, 1:37 PM IST

तेहरान - इराणच्या तेहरान आझादी स्टेडियमवर गुरुवारी ऐतिहासिक क्षणाचे जग साक्षीदार झाले. या मैदानावर खेळवण्यात आलेल्या इराण विरूद्ध कंबोडिया यांच्यातील सामन्याला ३५०० महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे, तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांना एक फुटबॉल सामना पाहता आला.

  • Women in #Iran made HISTORY today when thousands watched a football game in Tehran’s Azadi Stadium. They’ve been banned from purchasing tickets for the past 38 years. pic.twitter.com/aGr6AdM8bU

    — IranHumanRights.org (@ICHRI) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - काय सांगता..विराटने झळकावले पहिलेच शतक अन् केली स्मिथच्या शतकांची बरोबरी

इराणमधील अनेक फुटबॉल स्टेडियममध्ये महिलांना सामना पाहण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, इराण सरकारने नुकतीच ही बंदी हटवली आहे. फिफाने सांगितल्याप्रमाणे, जर ही बंदी कायम ठेवली असती तर, इराणच्या फुटबॉल संघाला निलंबित करण्यात आले असते. या संघर्षापाठी इराणची 'ब्लू गर्ल' म्हणून ओळखली जाणारी २९ वर्षीय सहर खोडयारीचे मोठे योगदान आहे. फुटबॉल चाहती असलेल्या सहरने पुरुषांच्या वेशात फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश केला होता. मात्र ती पकडली गेली. या अपराधामुळे तेथील न्यायालयाने तिला ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेपूर्वीच तिने न्यायालयासमोर स्वत:ला जाळून घेतले होते.

सहरच्या मृत्यूनंतर, इराणमध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनानंतर, इराण सरकारने महिलांना सामना पाहण्यास परवानगी दिली. गुरुवारी तेहरान आझादी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या इराण विरूद्ध कंबोडिया सामन्यात इराणने दमदार विजय मिळवला. इराणने कंबोडियाला १४-० ने मात दिली आहे.

Intro:Body:

after 40 years iran women attend football match

iran women latest news, iran vs cambodia football news, iran women football, latest sports news from iran, iran football news

ऐतिहासिक!..तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना

तेहरान - इराणच्या तेहरान आझादी स्टेडियमवर गुरुवारी ऐतिहासिक क्षणाचे जग साक्षीदार झाले. या मैदानावर खेळवण्यात आलेल्या इराण विरूद्ध कंबोडिया यांच्यातील सामन्याला ३५०० महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे, तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांना एक फुटबॉल सामना पाहता आला.

हेही वाचा - 

इराणमधील अनेक फुटबॉल स्टेडियममध्ये महिलांना सामना पाहण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, इराण सरकारने नुकतीच ही बंदी हटवली आहे. फिफाने सांगितल्याप्रमाणे, जर ही बंदी कायम ठेवली असती तर, इराणच्या फुटबॉल संघाला निलंबित करण्यात आले असते. या संघर्षापाठी इराणची 'ब्लू गर्ल' म्हणून ओळखली जाणारी २९ वर्षीय सहर खोडयारीचे मोठे योगदान आहे. फुटबॉल चाहती असलेल्या सहरने पुरूषांच्या वेशात फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश केला होता. मात्र ती पकडली गेली. या अपराधामुळे तेथील न्यायालयाने तिला ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेपूर्वीच तिने न्यायालयासमोर स्वत:ला जाळून घेतले होते. 

सहरच्या मृत्यूनंतर, इराणमध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनानंतर, इराण सरकारने महिलांना सामना पाहण्यास परवानगी दिली. गुरूवारी तेहरान आझादी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या इराण विरूद्ध कंबोडिया सामन्यात इराणने दमदार विजय मिळवला. इराणने कंबोडियाला १४-० ने मात दिली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.