ETV Bharat / sports

युझवेंद्र चहलला टी-20 विश्वकरंडक संघातून वगळलं, पत्नी धनश्री वर्माने शेअर केली भावूक पोस्ट - राहुल चहर

युझवेंद्र चहलची निवड टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात करण्यात आली नाही. निवड समितीने रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि राहुल चहर या फिरकीपटूंवर विश्वास दाखवला. यानंतर चहलची पत्नी धनश्री वर्मा इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिअॅक्ट झाली आहे.

yuzvendra-chahal-wife-dhanashree-verma-post-emotional-message-after-leggie-t20-world-cup
युझवेंद्र चहलला टी-20 विश्वकरंडक संघातून वगळलं, पत्नी धनश्री वर्माने शेअर केली भावूक पोस्ट
author img

By

Published : Sep 9, 2021, 6:47 PM IST

मुंबई - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात फिरकीपटू युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळाले नाही. तेव्हा चहलची पत्नी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा रिअॅक्ट झाली आहे.

युझवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 49 कसोटी सामन्यात 25.30 च्या सरासरीने आणि 8.32 च्या इकोनॉमी रेटने 63 गडी बाद केले आहेत. चहलची कामगिरी पाहता त्याची निवड संघात निश्चित मानली जात होती. परंतु निवड समितीने रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि राहुल चहर या फिरकीपटूंवर विश्वास दाखवला. यानंतर चहलची पत्नी धनश्री वर्मा इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिअॅक्ट झाली.

धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. यात ती म्हणते, आई म्हणते, ही वेळ देखील निघून जाईल. अभिमानाने जगा. कौशल्य आणि चांगले काम नेहमी साथ देतात. ही वेळ देखील निघून जाईल. गॉड इज ऑलवेज ग्रेट.

yuzvendra-chahal-wife-dhanashree-verma-post-emotional-message-after-leggie-t20-world-cup
धनश्री वर्माची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, युजवेंद्र चहलची निवड भारतीय संघात झाली नाही. याविषयी भारतीय संघाचे निवडकर्ते चेतन शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारतीय संघाला अशा फिरकीपटूची गरज आहे, जो चेंडू वेगाने स्पिन करू शकतो.

युजवेंद्र चहल आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात खेळणार आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य आहे. चहल आयपीएलच्या माध्यमातून चांगली कामगिरी करू शकतो. यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ओमान आणि यूएईमध्ये होणार आहे. भारत या देशाचे यजमानपद भूषवत आहे.

हेही वाचा - T-20 World Cup: आर. अश्विनचे भारतीय टी-20 संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन

हेही वाचा - Big News: टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील आणखी एकाला कोरोनाची लागण; सराव सत्र रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.