ETV Bharat / sports

WPL Today Fixtures : डब्ल्यूपीएलमध्ये आज खेळले जातील दुहेरी सामने, पाहा कोणता संघ कोणाशी भिडणार - डब्ल्यूपीएल

डब्ल्यूपीएलचा पहिला सीझन सुरू झाला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात शनिवारी पहिला सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला. आज दोन सामने (WPL Today Fixtures) खेळले जाणार आहेत.

WPL Today Fixtures
डब्ल्यूपीएल
author img

By

Published : Mar 5, 2023, 10:53 AM IST

नवी दिल्ली : डब्ल्यूपीएलमध्ये आज दुहेरी हेडर सामने खेळले जातील. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता होणार आहे. दिल्लीची कमान मेग लॅनिंगच्या हातात आहे, जिने अलीकडेच ऑस्ट्रेलियाला महिला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले. त्याचवेळी भारताला अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकून देणारी कॅप्टन शेफाली वर्माही दिल्लीत आहे. स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) कर्णधार असणार आहे.

गुजरात जायंट्सला महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियनने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या. एमआयच्या 207 धावांना प्रत्युत्तर देताना गुजरात जायंट्सचा संघ 15.1 षटकांत 64 धावांत गुंडाळला. जायंट्सची कर्णधार बेथ मुनीला डावाच्या पहिल्याच षटकात घोट्याला मार लागल्याने तिला सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याचवेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने 30 चेंडूत 65 धावा केल्या. तिला स्नेह राणाने बाद केले. गुजरातकडून दयालन हेमलताने नाबाद २९ धावा केल्या.

यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स : दुसरा सामना यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात होईल. डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे. यूपी वॉरियर्सची कर्णधार ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली आहे. त्यांच्यासमोर देशबांधव बेथ मुनीची टीम असणार आहे

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ : 1 शफाली वर्मा, 2 जेमिमाह रॉड्रिग्ज, 3 मेग लॅनिंग (कर्णधार), 4 मेरीजेन कॅप, 5 लॉरा हॅरिस, 6 जसिया अख्तर, 7 तान्या भाटिया (विकेटकीपर), 8 राधा यादव, 9 जेस जोनासेन, 10 टारा , 11 शिखा पांडे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य संघ: 1 स्मृती मानधना (कर्णधार), 2 दिशा कासट, 3 सोफी डेव्हाईन, 4 एलिस पेरी, 5 डॅन व्हॅन निकर्क, 6 रिचा घोष (विकेटकीपर), 7 कोमल जंजाड/आशाभाना, 8 प्रीती बोस, 9, 9 मेगन शुट, 10 रेणुका सिंग, 10 कनिका आहुजा/श्रेयंका पाटील.

हेही वाचा : WPL 2023 : मुंबई इंडियन्सची महिला आयपीएलमध्ये धडाक्याने सुरुवात, गुजरातचा उडवला धुव्वा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.