नवी दिल्ली : डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम 4 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. सीझनमध्ये 22 सामने खेळले जाणार आहे. ज्यामध्ये 20 लीग सामने होतील. आज डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सची कर्णधार पदाची धुरा सांभाळत आहे. तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन खेळाडू बेथ मुनी करत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या उपस्थितीत रंगतदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर आज डब्ल्यूपीएल त्यांचे राष्ट्रगीत देखील लाँच करणार आहे.
-
6 artists, 1 amazing song, and only 1 day to go!
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sing along to the anthem of the #TATAWPL tomorrow and be part of the biggest event in women's T20 cricket, kyunki yeh toh bas shuruat hai! @JayShah #YehTohBasShuruatHai #TataWPL2023 #TataWPLAnthem #AnthemLaunch pic.twitter.com/SO0tbSB1Uy
">6 artists, 1 amazing song, and only 1 day to go!
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2023
Sing along to the anthem of the #TATAWPL tomorrow and be part of the biggest event in women's T20 cricket, kyunki yeh toh bas shuruat hai! @JayShah #YehTohBasShuruatHai #TataWPL2023 #TataWPLAnthem #AnthemLaunch pic.twitter.com/SO0tbSB1Uy6 artists, 1 amazing song, and only 1 day to go!
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2023
Sing along to the anthem of the #TATAWPL tomorrow and be part of the biggest event in women's T20 cricket, kyunki yeh toh bas shuruat hai! @JayShah #YehTohBasShuruatHai #TataWPL2023 #TataWPLAnthem #AnthemLaunch pic.twitter.com/SO0tbSB1Uy
शंकर महादेवन डब्ल्यूपीएलचे राष्ट्रगीत : डब्ल्यूपीएलचे राष्ट्रगीत संगीतकार शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केले आहे. गायक हर्षदीप कौर आणि गायीका नीती मोहन यांच्यासह 6 गायक उद्घाटन समारंभात डब्ल्यूपीएलचे राष्ट्रगीत सादर करतील. 'क्यूंकी ये तो बस शुरोती है' हे डब्ल्यूपीएलचे राष्ट्रगीत आहे. कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि गायक एपी धिल्लन उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. उद्घाटन समारंभ संपल्यानंतर नाणेफेक होईल. संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होणार आहे.
डब्ल्यूपीएलमध्ये पाच संघांचा सहभाग : डब्ल्यूपीएलमध्ये पाच संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंज बंगलोर या संघांचा यात समावेश असणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सची कर्णधार आहे, स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आहे, ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली यूपी वॉरियर्सची कर्णधार आहे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज बेथ मूनी गुजरात जायंट्सची कर्णधार आहे, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया ( विकेटकीपर ), हेली मॅथ्यूज, धारा गुजर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर ( कर्णधार ), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, जिंतीमणी कलिता, इस्सी वोंग, सोनम यादव संघात खेळत आहेत. गुजरात जायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन : बेथ मुनी ( कर्णधार ), सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, दयालम हेमलता, सुषमा वर्मा, स्नेह राणा, अॅनाबेल सदरलँड, मानसी जोशी, अश्विनी कुमारी संघात खेळत आहेत.