ETV Bharat / sports

Virat Kohli ODI Record : 'विराट'चा नादखुळा; सचिन अन् संघकाराचा मोडला रेकॉर्ड - भारत विरुद्ध श्रीलंका वानखे़डे स्टेडियम

Virat Kohli ODI Record : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये नवनवीन विक्रम करत आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या ३३व्या सामन्यात विराटनं शानदार फलंदाजी करत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यासोबतच त्याच्या नावावर अनेक (World Cup २०२३) मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 6:07 PM IST

Updated : Nov 2, 2023, 8:59 PM IST

मुंबई Virat Kohli ODI Record : आयसीसी विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला (World Cup २०२३) गेला. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत संघासाठी कठीण प्रसंगी उत्कृष्ट फलंदाची केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माच्या रूपाने मोठा धक्का बसला. यानंतर विराटने क्रीजवर येऊन गिलसोबत डावाची धुरा सांभाळली आणि धावसंख्या पुढे नेली. अखेर हा सामना भारतानं 302 धावा राखून जिंकला आहे.

  • HISTORY AT THE WANKHEDE STADIUM...!!!

    Virat Kohli has surpassed Sachin Tendulkar's record of most calendar years with 1,000+ ODI runs - 8*. pic.twitter.com/K2EPdA9GiD

    — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराटनं सावरला सामना : या सामन्यात विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. विराटने 50 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. या खेळीदरम्यान विराटने 8 चौकार मारले. २०२३ च्या विश्वचषकातील विराट कोहलीचे हे चौथे अर्धशतक आहे. तर त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे ७० वे अर्धशतक आहे.

कॅलेंडर वर्षात 1000 धावा : विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेट कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. कारकिर्दीत 8व्यांदा एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

नॉन ओपनर म्हणून सर्वाधिक धावा : विराट कोहलीनं गुरुवारी आणखी एक भीम पराक्रम केलाय. वर्ल्डकपच्या इतिहासात नॉन ओपनर म्हणून विराट कोहलीनं वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक 13 अर्धशतकं झळकावण्याचा पराक्रम केलाय. आजवर वर्ल्डकपच्या इतिहासात श्रीलंकेचा कुमार संगकारा सोडून हा पराक्रम कोणालाच करता आला नाही.

सचिन तेंडुलकरला मागं टाकलं : श्रीलंकेविरोधात विराट कोहलीने (Virat Kohli) 34 धावा करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) सचिनचा विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर जमा झालाय. विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजारांपेक्षा जास्त धावा केल्या होता. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेय.

कॅलेंडर वर्षात किती वेळा सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

1 - विराट कोहली - 8

2 - सचिन तेंडुलकर - 7

3 - सौरव गांगुली - 6

4 - कुमार संघकारा - 6

5 - रिकी पाँटिंग - 6

हेही वाचा -

  1. Surendra Nayak Exclusive Interview : भारतीय संघासाठी रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी - माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक
  2. Kohli fan at Wankhede : विराट कोहलीची बॅटिंग पाहायला वानखडेवर दिवान्यांची गर्दी

Last Updated : Nov 2, 2023, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.