ETV Bharat / sports

Women's Day 2022 : भारतातील 'या' महिलांच्या कारनाम्यामुळे जगभरात वाजतोय भारताचा डंका

8 मार्च रोजी संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' ( International Women's Day ) साजरा करत आहे. महिलांनी राष्ट्रासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत देखील हा दिवस महिला दिन ( Women's Day 2022 ) म्हणून साजरा करत आहे. भारतीय महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचा गौरव केला आहे. आज आपण अशा खेळाडूंवर एक नजर टाकू, ज्यांनी देशासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Women's Day
Women's Day
author img

By

Published : Mar 8, 2022, 12:53 PM IST

हैदराबाद : आज महिला घरातील काम करण्यापासून प्रत्येक क्षेत्रात आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या आधुनिक युगात स्त्रिया आपल्या सर्व बेड्या ( Women's Day significance ) तोडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत.

शिक्षणामुळे भारतीय महिलांनी साहित्य, विज्ञान, वैद्यक आणि क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, क्रीडा क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या महिला खेळाडूंनी ( Indian women players ) आपले कर्तृत्व जगासमोर सिद्ध केले आहे. देशांतर्गत खेळांच्या पलीकडे जाऊन ती आज जगभरातील पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. ती प्रत्येक खेळात सक्रिय सहभाग घेते.

मर्यादित साधनांबद्दल रडत बसण्याऐवजी, ती तिच्या कठोर परिश्रमाने आणि संघर्षाने ती सर्व आव्हानांवर मात करत आहे, जी तिच्या मार्गात अडथळे बनून उभी आहे. आज आम्ही तुम्हाला क्रीडा जगतातील ( Women's Day theme ) अशा दिग्गज महिला खेळाडूंबद्दल सांगणार ( Happy Women's Day ) आहोत, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगात रोल मॉडेलची भूमिका बजावली ( History of Women's Day ) आहे. तर भारताचे नावही संपूर्ण जगात रोशन केले आहे.

क्रिकेटर मिताली राज ( Cricketer Mithali Raj )

Cricketer Mithali Raj
Cricketer Mithali Raj

मिताली दोराई राज हिला भारताची महान महिला फलंदाज म्हणूनही ओळखले जाते. मिताली राज मूळची राजस्थानच्या जोधपूरची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिची कारकीर्द जवळपास दोन दशकांची आहे. त्यादरम्यान त्याने अनेक टप्पे गाठले आहेत. 39 वर्षीय फलंदाज ही भारताची एकमेव कर्णधार आहे. जिने दोन 50 षटकांच्या विश्वचषक फायनलमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

मिताली राज ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा पार करणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे. वनडेमध्ये सलग सात अर्धशतके झळकावणारी राज ही पहिली खेळाडू आहे.

जून 2018 मध्ये महिला T20 आशिया कप 2018 दरम्यान, ती T20I मध्ये 2,000 धावा करणारी भारतातील पहिली खेळाडू बनली. तसेच 2000 WT-20I धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटर बनली. सप्टेंबर 2019 मध्ये, राजने 50 षटकांच्या फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी T20I क्रिकेटमधून माघार घेतली. मिताली राजला भारत सरकारने 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2015 मध्ये पद्मश्री आणि 2017 मध्ये विस्डेन लीडिंग वुमन क्रिकेटर आणि 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

पीव्ही सिंधु भारतीय बॅडमिंटन खेळाडू ( PV Sindhu Badminton Player )

PV Sindhu Badminton Player
PV Sindhu Badminton Player

पुसरला वेंकट सिंधू हिला पीव्ही सिंधू म्हणूनही ओळखले जाते. ती आतापर्यंतच्या सर्वोत्तम भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. सिंधूने ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.

शटलर पीव्ही सिंधूने 2018 कॉमनवेल्थ गेम्स आणि 2018 आशियाई गेम्समध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक आणि उबेर कपमध्ये दोन कांस्यपदक जिंकले आहे. सिंधूला यापूर्वी अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. तिला पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

मेरी कोम (बॉक्सर) (Boxer Mary Kom )

Boxer Mary Kom
Boxer Mary Kom

जिंकण्यासाठी आपल्या अथक मोहिमेमुळे, मेरी कोमला भारतीय बॉक्सिंगच्या शिखरावर पोहोचण्यासाठी फारच कमी वेळ लागला. 2001 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. त्यानंतर मेरी कोमने 2002 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

मेरी कोम ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी महिला बॉक्सर आहे. महिला आणि पुरुष बॉक्सर्समध्ये तिच्या नावावर सर्वाधिक आठ पदके आहेत. पण 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यावर भारतीय बॉक्सिंगसाठी सर्वात महत्त्वाचा विजय मिळाला.

2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि 2018 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी, पहिली भारतीय महिला बॉक्सर होण्याचा मान मेरी कोमच्या नावावर आहे. ती पाच वेळा आशियाई चॅम्पियनही आहे.

पॅरालिम्पियन अवनी लेखरा ( Paralympian Avni Lekhra )

Paralympian Avni Lekhra
Paralympian Avni Lekhra

अवनी लेखरा ही भारतातील सर्वोत्कृष्ट पॅरालिम्पियन आहे. सध्या, महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये SH1 मध्ये जागतिक क्रमवारीत 2 दुसऱ्या स्थानी आहे. अवनीने अनेक प्रसंगी देशाचा गौरव केला आहे.

अवनीने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 10 मीटर एअर रायफल स्टँडिंगमध्ये सुवर्णपदक आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. लेखरा ही पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

त्यानंतर, तिने उन्हाळी पॅरालिम्पिक 2020 मध्ये देखील भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले. अंतिम स्पर्धेत 249.6 च्या स्कोअरसह, युवा नेमबाजाने पॅरालिम्पिक विक्रम तसेच जागतिक विक्रमही केला. तिला भारत सरकारने 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Weightlifter Mirabai Chanu )

Weightlifter Mirabai Chanu
Weightlifter Mirabai Chanu

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मोहिमेची सुरुवात चांगली झाली होती. मणिपूरच्या वेटलिफ्टरने प्रतिष्ठित शोपीस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वेटलिफ्टिंग 202 किलो (87 + 115) (स्नॅच आणि क्लीन आणि जर्क दोन्ही) 49 किलो वजन गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.

मीराबाईने तिची रिओ ऑलिम्पिकची निराशा दूर केली, जिथे तिला तीन प्रयत्नांत एकही क्लीन अँड जर्क उचलण्यात अपयश आले होते. तिनेने वर्ल्ड चॅम्पियन्स तसेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

28 वर्षीय मीराबाईने 2014 मध्ये ग्लासगो येथे 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून तिचे पहिले राष्ट्रकुल क्रीडा पदक जिंकले होते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती अयशस्वी ठरली होती, परंतु 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी दोन वर्षांनंतर ती परतली.

गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ते पुढे नेले. पण तिची खरी परीक्षा 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाली, जेव्हा तिने तिच्या मागील ऑलिम्पिक पराभवातून पुनरागमन केले आणि रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर बनली. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले आणि सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या कर्णम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली.

या महिला क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी गर्दीतून बाहेर उभे राहत महिला सक्षमीकरण महत्त्वाचे असल्याचे दाखवून देण्याचा आदर्श घालून दिला आहे. कारण स्त्रिया प्रत्येक गोष्ट करू शकतील, ज्यासाठी या त्यांची प्रेरणा ठरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.