हैदराबाद: वेस्ट इंडिजचा संघ जून महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज ( Pakistan vs West Indies )संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ( Pakistan Cricket Board ) एक मीडिया रिलीजमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ही वनडे मालिका आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेचा भाग असणार आहे.
-
PCB announces schedule of West Indies ODIs#PAKvWI pic.twitter.com/JR1dPvnTM5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PCB announces schedule of West Indies ODIs#PAKvWI pic.twitter.com/JR1dPvnTM5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 28, 2022PCB announces schedule of West Indies ODIs#PAKvWI pic.twitter.com/JR1dPvnTM5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 28, 2022
वेस्ट इंडिजचा संघ 5 जूनला इस्लामाबादला येणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याचा ( West Indies tour of Pakistan ) एक भाग आहे. त्यावेळी, वेस्ट इंडिज संघाला कोविड 19 विषाणूचा फटका बसला होता. ज्यामध्ये तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या एका सदस्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.कोविड प्रकरणे असूनही, दोन्ही संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळू शकले.
तथापि, त्यानंतरचा एकदिवसीय सामना जूनपर्यंत पुढे ढकलावा लागला. कारण वेस्ट इंडिज ताफ्यातील इतर पाच सदस्यांना व्हायरसमुळे वगळण्यात आले. यानंतर दोन्ही बोर्डांनी एकदिवसीय मालिका आणखी आयोजित करण्यास सहमती दर्शवली. वनडे मालिकेतील तीनही सामने रावळपिंडी येथील स्टेडियमवर अनुक्रमे 8, 10 आणि 12 जूनला खेळले जाणार आहेत. पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मायदेशातील मालिकेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत अंतिम सामना जिंकून मालिकेत कब्जा केला. पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले पण अंतिम सामना विंडीजने 10 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिका सुद्धा जिंकली.