ETV Bharat / sports

टी-20 विश्वकरंडक अजून सुरूही झालं नाही, पण डॅरेन सॅमीचा मोठा दावा - West Indies

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने सांगितलं की, गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ टी-20 विश्वकरंडकासाठी तयार आहे.

West Indies all the way - it's no brainer for me: Darren Sammy on T20 World Cup
टी-20 विश्वकरंडक अजून सुरूही झालं नाही पण डॅरेन सॅमीचा मोठा दावा
author img

By

Published : Aug 22, 2021, 7:52 PM IST

दुबई - आयसीसी टी-20 विश्वकरंडक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाची उत्सुकता संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्व संघ या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहे. यादरम्यान, कोणता संघ वरचढ ठरणार याची चर्चा रंगली आहे. यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने देखील त्यांचं मत मांडलं आहे.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने सांगितलं की, गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ टी-20 विश्वकरंडकासाठी तयार आहे. सॅमी आयसीसी डिजिटल शोमध्ये बोलत होता. तो म्हणाला की, मला जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये, वेस्ट इंडिजचा संघ टी-20 विश्वकरंडकासाठी तयार आहे. जेव्हा तुम्ही वेस्ट इंडिजकडे पाहता आणि अनेक लोक म्हणतात की, मी एकतर्फा बोलत आहे. परंतु, अखेरच्या चार स्पर्धा पाहिल्यास आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आणि यातील दोन वेळा आम्ही स्पर्धा जिंकली.

आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. कर्णधार केरॉन पोलार्ड चांगले पाठबळ देत आहे. याशिवाय ख्रिस गेल, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, फॅबियन एलेन आणि एविन लुईस आहे. माझ्याकडे असे अनेक खेळाडूंची यादी आहे जे कोणत्याही संघावर भारी पडू शकतात, असे देखील डॅरेन सॅमीने सांगितलं.

डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचने 2012 आणि 2016 मध्ये टी 20 विश्व करंडक जिंकला होता. सॅमी पुढे म्हणाला, इंग्लंडचे खेळाडू वातावरणासाठी जुळवून घेण्यात यशस्वी ठरतात. मला आशा आहे की, वेस्ट इंडिज शिवाय ग्रुप ए मध्ये इंग्लंडचा संघ उपांत्य फेरी गाठेल.

तुम्ही पाहू शकता इंग्लंडने टी-20 मध्ये चांगला खेळ केला आहे. ते 2016 चे उपविजेता आहेत. दोन अशी ठिकाणे आहेत जिथे खेळपट्टी समान असते. ती ठिकाण भारत आणि वेस्ट इंडिज. इंग्लंडने त्या ठिकाणी अंतिम फेरी गाठली. त्यांचे खेळाडू वातावरणासाठी जुळवून घेण्यात माहीर आहेत, असे देखील डॅरेन सॅमीने सांगितलं.

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक दक्षिण अफ्रिकेसाठी महत्वपूर्ण - टेम्बा बावुमा

हेही वाचा - जो रुटला 'त्या' रणणितीपासून प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडने का रोखलं नाही, मायकल वॉनचा कडक सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.