ETV Bharat / sports

Sehwag & Shoaib : विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने जुन्या आठवणींना उजाळा देताना, शोएब अख्तरला 'या' गोष्टीवरुन काढला चिमटा - Sports News

आजकाल भारत आणि पाकिस्तानचे संघ मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळत नसतील, परंतु भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला चिमटा काढताना हल्ला, आपल्या खेळाच्या दिवसांची आठवण करून दिली. वास्तविक, सेहवाग म्हणाला की, अख्तरला माहित आहे की, तो चेंडू फेकताना आपले मनगट वाकवतो आणि तो चकिंग देखील करतो.

Sehwag & Shoaib
Sehwag & Shoaib
author img

By

Published : May 17, 2022, 8:26 PM IST

नवी दिल्ली: भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने ( Former India batsman Virender Sehwag ) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला चिमटा काढला आहे. वीरेंद्र सेहवागच्या मते, शोएब अख्तर 'चकिंग' करायचा. होम ऑफ हीरोज स्पोर्ट्स 18 ( Home of Heroes Sports 18 ) च्या नवीन एपिसोडमध्ये सेहवाग म्हणाला की, पाकिस्तानी फास्ट बॉलरला त्याच्या अॅक्शनमुळे खेळणे कठीण होते.

सेहवाग म्हणाला, शोएबला माहित आहे की तो 'चकिंग' करायचा. अन्यथा आयसीसी ( International Cricket Council ) त्याच्यावर बंदी का घालेल? त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली योग्य गोलंदाजी करत असे. त्यामुळे त्याचा चेंडू समजणे सोपे होते. पण शोएब अख्तरसोबत हात आणि चेंडू कुठून येईल याचा अंदाज लावता आला नाही. सेहवागने सांगितले की, सध्या मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड ( Former fast bowler Shane Bond ) हा त्याच्यासमोर सर्वात कठीण गोलंदाज होता.

ब्रेट लीचा सामना करण्यास कधीही घाबरलो नाही -

सेहवाग म्हणाला, त्याचे (बॉन्डचे) चेंडू आपल्या अंगावर वेगाने यायचे. जरी तो ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करत असो. तो म्हणाला की, ली आणि शोएब हे इतर दोन गोलंदाज होते, ज्याचा तो सामना करत होता. सेहवागने कबूल केले की, ब्रेट लीचा सामना करण्यास मी कधीही घाबरलो नाही. पण शोएबला दोन फटके मारायचो, मग तो बीमर किंवा यॉर्करने हल्ला करायचा. सेहवागने कबूल केले की, तो पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाला आपला मित्र मानतो. सेहवागने कसोटीमध्ये शोएब आणि पाकिस्तान संघाचा सामना करताना एक शतक, दोन द्विशतक आणि त्रिशतकांसह 90 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

छाप पाडण्यासाठी मला त्यांच्यापेक्षा जलद धावा कराव्या लागल्या -

सेहवाग म्हणाला, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली हे सगळे 150-200 चेंडू खेळून शतके झळकावायचे. मी त्याच गतीने शतक केले तर मला कोणीही लक्षात ठेवणार नाही. माझी छाप पाडण्यासाठी मला त्यांच्यापेक्षा जलद धावा कराव्या लागल्या. सेहवागने हे देखील स्पष्ट केले की, हे स्थान मिळविण्यासाठी त्याने स्वत: ला जलद धावा करण्यापासून कधीच रोखले नाही. सेहवागच्या मुलाखतीचा पहिला भाग 19 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता स्पोर्ट्स18 वर 'होम ऑफ हिरोज'वर पाहता येईल.

हेही वाचा - James Anderson declares fit : इंग्लंड संघात निवडीसाठी अँडरसनने स्वतःला तंदुरुस्त घोषित केले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.