ETV Bharat / sports

Kohli resigns as Test captain: विराट कोहलीने नेतृत्व सोडल्याने मला धक्का बसला होता- रिकी पाँटिंग - Kohli resigns as Test captain

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Former Australia captain Ricky Ponting) म्हणाला, विराट कोहलीने कसोटीचे नेतृत्व सोडल्यानंतर मला आश्चर्य वाटले. त्याचबरोबर त्याने कोहलीच्या कसोटी नेतृत्वावर एक दृष्टीक्षेप टाकला आहे.

VIRAT KOHLI
VIRAT KOHLI
author img

By

Published : Jan 31, 2022, 4:36 PM IST

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिगने खुलासा (Ricky Pontig's Reveal) केला आहे की, जेव्हा विराट कोहलीने कसोटीचे नेतृत्व सोडले, तेव्हा आश्चर्य वाटले होते. रिकी पाँटिंग म्हणाला की, विराट कोहलीने आयपीएल 2021 दरम्यान नेतृत्व सोडण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिाका विरुद्धच्या मालिकेत भारताला 2-1 अशा फरकाने पराभव (India's 2-1 defeat against Africa) स्विकारावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

आयसीसी रिव्ह्यू शोच्या (ICC Review Show) पहिल्या एपिसोडमध्ये पॉन्टिंग म्हणाला, होय, मला खरोखरच आश्चर्य वाटले. आयपीएल (२०२१) पुढे ढकलण्यापूर्वी माझे विराटशी बोलणे झाले होते. तेव्हा ते पद सोडण्याबाबत बोलत होते. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांचा कर्णधार राहण्यासाठी तो किती उत्कट होता. ते म्हणाले, त्यांना त्यांचे पद खूप आवडते आणि जपले. अशा स्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने खूप काही साध्य केले होते हे उघड आहे. त्याने कर्णधारपद सोडल्याचे ऐकून मला खरोखरच धक्का बसला होता.

कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (Kohli resigns as Test captain) दिल्यानंतर, पाँटिंगने कर्णधारांच्या शेल्फ लाइफपासून ते भारतातील चाहत्यांचा प्रचंड दबाव यासारख्या कारणांकडे लक्ष वेधले आहे. तो म्हणाला, "मला त्या निर्णयाचा धक्का बसला होता, पण नंतर मी इतर गोष्टींबद्दल विचार करू लागलो, अगदी कर्णधार म्हणून माझ्या काळाचा ही," तो म्हणाला. मी या आधीही म्हटले आहे की, मला असे वाटते की मी खुप वेळ क्रिकेट खेळलो. जेवढे मला खेळायला हवे होते. त्या काळात मी कर्णधारही होतो.

पाँटिंग पुढे म्हणाला, मला वाटते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांचे आणि आणि अगदी प्रशिक्षकांसाठी संभाव्यतः शेल्फ लाइफ आहे. विराट जवळपास सात वर्षे कर्णधार राहिला. जर जगात कोणता असा देश आहे, जो कर्णधारासाठी कठीन आहे, तर तो कदाचित भारत आहे. कारण या ठिकाणी हा खेळ खुप लोकप्रिय आहे आणि प्रत्येकजण भारतीय संघाला चांगले करताना बघायचे आहे.

पाँटिंगने भारताला विदेशी धरतीवर अधिक विजय मिळवून देण्यासाठी कोहलीच्या प्रयत्नाचे कौतुक केले. कोहलीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2021 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आघाडी घेतल्याशिवाय 2018 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy in 2018) जिंकली. 47 वर्षीय माजी कर्णधार म्हणाला की, कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा खरे लक्ष कसोटी क्रिकेटवर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.