ETV Bharat / sports

Virat Kohli Tweet : फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना विराट कोहलीचे ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर - क्रिकेट न्यूज

फॉर्ममशी झगडत असलेल्या विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे. विराटने या सामन्यापूर्वी ट्विट करून फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना उत्तर ( Virat Kohli reply to critics ) दिले आहे.

Virat Kohli
विराट कोहली
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:54 PM IST

लंडन: विराट कोहली सध्या त्याच्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जाणारा किंग कोहलीला यावेळी टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी कोहलीला संघाबाहेर ठेवण्याबाबतही बोलले आहे. यावर आता स्वत: विराट कोहलीने ट्विट करत सर्वांना उत्तर दिले ( Virat Kohli reply to critics ) आहे.

2019 सालापासून कोहलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही शतक झळकावता आलेले ( Virat Kohli not century since 2019 ) नाही. तो सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिकेत सहभागी आहे. या मालिकेतील तिसरा सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात कोहली फॉर्ममध्ये परतेल अशी आशा कोहलीसोबतच त्याच्या सर्व चाहत्यांना असेल. या सामन्यापूर्वी कोहलीने एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.

शेवटच्या वनडेच्या एक दिवस आधी शनिवारी कोहलीने ट्विटरवर ( Virat Kohli tweet ) टीकाकारांना आपल्या पद्धतीने उत्तर दिले. त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पंख असलेल्या फोटोसमोर बसला आहे. या चित्रासोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'परस्पेक्टिव' लिहिले आहे, ज्याचा अर्थ ' दृष्टीकोन' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. या फोटोमध्ये कोहली निळी जीन्स आणि टी-शर्टमध्ये बोर्डसमोर बसला आहे, ज्यावर दोन पंख आहेत आणि त्यावर लिहिले आहे, ''मी पडलो तर काय, पण माझ्या मित्रा, तू उडायला लागलास तर काय.''

केविन पीटरसननेही कोहलीच्या या पोस्टला प्रत्युत्तर दिले ( Kevin Pietersen reply to Kohli post ) आहे. पीटरसनने लिहिले आहे, तू मोठा खेळाडू आहेस. तू क्रिकेटमध्ये जे काही मिळवले आहे, ते अनेकांचे स्वप्न असते आणि हे लोक हा खेळ खेळणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक आहेत.

भारतीय संघ रविवारी, 17 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जो संघ जिंकेल त्याची मालिका असेल. भारताने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करताना यजमान इंग्लंडने 100 धावांनी विजय मिळवला. आता शेवटच्या वनडेत रविवारी दोन्ही संघ मँचेस्टरमध्ये आमनेसामने येतील.

हेही वाचा - Kapil Dev Statement : विराटला पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा मार्ग स्वतःच ठरवावा लागेल कपिल देव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.