नवी दिल्ली: काही दिवसापूर्वीच भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (India's star player Virat Kohli) आपण कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विराटच्या या धक्कादायक निर्णयावर बरीच चर्चा झाली. परंतु आता या सर्व गोष्टीनंतर विराट कोहलीने प्रथमचं मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला आहे की, नेतृत्वाची भूमिका निभावण्यासाठी कोणत्याही संघाचा कर्णधार असावा असे, गरजेचे नाही.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Former India captain Virat Kohli) म्हणाला, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या गोष्टीची समज असली पाहिजे की, आपण काय मिळवण्यासाठी निर्धारित केले आहे. त्यानंतर तुम्ही हे पाहिले पाहिजे की, तुम्ही ते लक्ष्य साध्य केले आहे की नाही. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, यासाठी तुम्हाला त्याबद्दल माहिती असायला हवे. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघासाठी अधिक सक्षम करण्यासाठी मदत करु शकता. यासाठी त्यावर गर्व करण्याची आवश्यकता आहे.
कोहली पुढे म्हणाला, लीडर होण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. जेव्हा एमएस धोनी संघात होते, तेव्हा असे नव्हते की ते लीडर नव्हते. आम्ही सर्वजण नेहमीच त्यांच्याकडून इनपुट घेत होतो. जिंकणे किंवा हारणे आपल्या हातात नसते. उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे आणि दररोज प्रगती करणे महत्वाचे आहे.
विराट म्हणाला, मला वाटते सर्व प्रकारच्या भूमिका आणि संधी स्वीकाराव्या लागतात. प्रथम एमएस धोनी कर्णधार आणि नंतर मी कर्णधार झालो. मात्र, इतके दिवस माझी मानसिकता तशीच राहिली आहे. मी नेहमी कर्णधारासारखा विचार करत होतो.
विराट कोहली पुढे म्हणाला की, मला वाटते की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसाच्या शेवटी, तुमच्याकडे अधिक जबाबदारी असल्यास, तुम्हाला माहित आहे की तुमची दृष्टी वेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःशी खरे असले पाहिजे. माझा खेळ जिथे असायला हवा तिथे नाही हे मला माहीत असेल तर मला कोणाला दोष देण्याची गरज नाही.
"संवाद ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मला तुमच्या शब्दांची गरज नाही असे सांगून तुम्ही एखाद्याला टाळू शकत नाही," तो म्हणाला. तुम्ही आदराने म्हणू शकता की मी चांगल्या ठिकाणी आहे आणि मला मदत हवी असल्यास मी तुमच्यापर्यंत पोहोचेन. या प्रकारच्या समतोलाने माझ्यासाठी काम केले आहे.
मला माहित होते की, आमच्याकडे क्षमतेची कमी नाही, मी टॅलेंटला तिच्या क्षमतेनुसार वाढवण्याचा विचार करत होतो. मला माझी दृष्टी मर्यादित ठेवायची नव्हती. आपल्याला दररोज कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, ही एक सतत प्रक्रिया आहे. एक कर्णधार म्हणून मी अशी सांघिक संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत होतो की आपण कुठूनही जिंकू शकतो.