ETV Bharat / sports

Virat Kohli Net Worth: विराट कोहलीची वर्षभरात १ हजार कोटींहून अधिक कमाई, उत्पन्नाचे साधन जाणून व्हाल थक्क - virat kohli adverstisement fees

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यामुळेच जगातील मोजके प्रभावशाली असणाऱ्या व्यक्तीमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. स्टॉक ग्रोच्या अहवालानुसार विराटची एकूण संपत्ती १ हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

Virat Kohli Net Worth
विराट कोहली संपत्ती
author img

By

Published : Jun 19, 2023, 7:53 AM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची एकूण संपत्ती 1 हजार कोटींहून अधिक झाली आहे. विराट देशातील सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटींपैकी आहे. स्टॉक ग्रोनुसार, कोहलीची एकूण संपत्ती सुमारे 1,050 कोटी रुपये आहे. यामध्ये क्रिकेट संस्थांशी करार, ब्रँड एंडोर्समेंट, ब्रँडची मालकी आणि सोशल मीडिया पोस्टमधून मिळणाऱ्या संपत्तीचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, कोहलीची सर्वाधिक कमाई ही ब्रँड एंडोर्समेंट म्हणजे विविध कंपन्यांच्या जाहिरातीमधून होते.

कोहलीला त्याच्या टीम इंडियाबरोबरील करारातून दरवर्षी ७ कोटी रुपये मिळतात. तर प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये विराटला मिळतात. टी२० लीगमधून विराटची वर्षाला १५ कोटी रुपये कमाई होते.

  • Virat Kohli:

    Net Worth - 1,050cr.
    Per post charge - 8.9cr on Instagram, 2.5cr on Twitter.
    Properties - 110cr.
    Cars - 31cr. pic.twitter.com/0zy9CWZlS3

    — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळतात तब्बल 175 कोटी रुपये : कोहली क्रिकेटपटूबरोबर गुंतवणूकदारदेखील आहे. त्याने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल, स्पोर्ट्स कॉन्व्हो, डिजिट आदी स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. कोहली व्हिओ, मिंत्रा, ब्ल्यू स्टार, वोलिनी, एचबीसी, उबेर, एमआरएफ, सिंथोल अशा विविध १८ कंपन्यांच्या जाहिराती करतो. त्याला एका जाहिरात शुटिंगसाठी साडेसात ते दहा कोटी रुपये मिळतात. तर ब्रँड एंडोर्समेंटमधून कोहलीला तब्बल १७५ कोटी रुपये मिळतात.

  • Net worth of PCB - 55 Mln $

    NW of Virat Kohli - 122 Mln $

    Virat can Buy whole PCB and make babar azam to play on his lawn. pic.twitter.com/AozZSC6gw9

    — KT (@IconicRcb) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोहली सोशल मीडिया पोस्टसाठी किती घेतो? कोहली सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून त्याच्या फॉलोअर्सची संख्यादेखील आहे. त्यामुळे कंपन्यांकडून होणाऱ्या पोस्टसाठी कोहली प्रचंड शुल्क आकारतो. कोहली इंस्टाग्रामवरील पोस्टसाठी ८.९ कोटी रुपये तर ट्विटसाठी २.५ कोटी कंपन्यांकडून घेतो. त्याच्या मुंबईतील घराची किंमत ३४ कोटी रुपये तर गुरुग्राममधील घराची किंमत ८० कोटी रुपये आहे. विराटला कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे 31 कोटी रुपयांच्या विविध आलिशान कारही आहेत. कोहलीकडे एक फुटबॉल क्लब, टेनिस संघ आणि कुस्ती संघ यांची मालकीदेखील आहे.

भारत हरल्यानंतर विराटसह अनुष्का झाले ट्रोल- आयसीसी २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केल्यानंतर विराट कोहली ट्रोल झाला. विराट कोहली अवघ्या ४९ धावांवर बाद झाल्याने चाहत्यांनी अभिनेत्री अनुष्काला शर्मालाही ट्रोल केले. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा पतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. जेव्हापासून अनुष्का शर्मा सामना पाहायला येते, तेव्हा विराटची कामगिरी खालावते, असे ट्रोलरने म्हटले आहे.

हेही वाचा-

  1. ICC World Test Championship Final 2023 : विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल
  2. WTC Final 2023 : ICC प्रोमोमध्ये WTC फायनल 2023 करता स्मिथ विरुद्ध कोहलीचे पोस्टर
  3. Virat Anushka In Ujjain : विरुष्काने घेतले बाबा महाकालचे दर्शन, केली 'ही' प्रार्थना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.