ETV Bharat / sports

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, विराट कोहलीचे आवाहन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून सर्वांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावं, असे आवाहन केलं आहे.

virat-kohli-makes-appeal-to-citizens-follow-covid-19-protocols-maintain-social-distancing
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, विराट कोहलीचे आवाहन
author img

By

Published : Apr 20, 2021, 4:50 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून सर्वांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावं, असे आवाहन केलं आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विराटने हे आवाहन केलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊटवर विराटचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सर्वांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावं. यात सर्वांनी मास्क वापरावा. तसेच सोशल डिस्टन्सिंगचं नित्यनियमान पालन करावं. कोरोनाला हरवण्यासाठी या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, असे विराट सांगताना पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे तब्बल २ लाख ५९ हजार १७० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली संघासाठी आनंदाची बातमी

हेही वाचा - नेपालच्या युवा फलंदाजाचा विश्वविक्रम, पहिल्या ३ टी-२० सामन्यात केला 'हा' कारनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.