मोहाली : भारतीय कसोटी संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने ( Newly appointed captain Rohit Sharma ) विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माने गुरुवारी स्पष्ट केले की, श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी आणि विराट कोहलीसाठी यादगार बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. विराट कोहली हा 100वा कसोटी सामना खेळणारा भारताचा 12 खेळाडू ठरणार आहे. त्याच्या अगोदर 11 भारतीय खेळाडूंनी 100 व त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
-
💬 💬 We want to make the occassion special for @imVkohli: #TeamIndia Captain @ImRo45 #INDvSL | @Paytm | #VK100 pic.twitter.com/NOxk0bTRr8
— BCCI (@BCCI) March 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💬 💬 We want to make the occassion special for @imVkohli: #TeamIndia Captain @ImRo45 #INDvSL | @Paytm | #VK100 pic.twitter.com/NOxk0bTRr8
— BCCI (@BCCI) March 3, 2022💬 💬 We want to make the occassion special for @imVkohli: #TeamIndia Captain @ImRo45 #INDvSL | @Paytm | #VK100 pic.twitter.com/NOxk0bTRr8
— BCCI (@BCCI) March 3, 2022
त्याचबरोबर विराट कोहली 100वा कसोटी ( Virat Kohli 100th Test match ) खेळणारा जगातील 71 वा खेळाडू ठरणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma told about virat ) म्हणाला, त्यांच्यासाठी (विराटसाठी) हा खूप छान प्रवास राहिला आहे. त्याने पदार्पण केल्यापासून आणि त्याचा 100 वा सामना खेळण्यासाठी खूप लांबचा आणि आश्चर्यकारक प्रवास केला आहे. त्याने या विशिष्ट फॉरमॅटमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. ज्याच्यामुळे संघ ही पुढे जात आहे. त्याच्याकडून संघालाही अजून अपेक्षा आहेत.
रोहित शर्माने सांगितले की, हे बघने शानदार राहिले आहे की, त्याने कसोटीत दमदार प्रदर्शन आपल्या नावे केले आहे. तसेच तो या पुढील वर्षांतही अशीच कामगिरी करत राहील. आम्हाला त्याच्यासाठी सुरुवातीचा कसोटी सामना खास बनवायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द ( Virat Kohli Test career ) -
विराट कोहलीने 20 जून 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध सबिना पार्क येथे कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर विराट कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी ( Virat Kohli 99 Test matches ) सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 168 डावात 50.39 च्या सरासरीने आणि 50.68 च्या स्ट्राईक रेटने 7962 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 27 शतकं आणि 28 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने 7 द्विशतकंसुद्धा झळकावली आहेत. यामध्ये तो 10 वेळा नाबाद राहिला आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे. तसेच त्याने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 896 चौकार आणि 24 षटकार लगावले आहेत.
हेही वाचा - Ind V Sl Test Series : 100 व्या कसोटी निमित्त विराट कोहलीवर आजी माजी खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव