जोहान्सबर्ग: नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिका (India vs South Africa test match) पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला 2-1 फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला कर्णधार पदाचा तडका फडकी राजीनामा (Virat Kohli steps down as Test captain) देवून टाकला. त्यानंतर बऱ्याच आजी माजी खेळाडूंनी त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मात्र आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विराट कोहलीला आपला सुपरहिरो म्हणाले आहे.
मोहम्मद सिराज जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटीच्या (Injury to second Test Mohammad Siraj) पहिल्या दिवशी त्याला दुखापत झाली, ज्यामध्ये भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला होता. त्यामुळे तो तिसरा कसोटी सामना खेळू शकला नाही. मात्र त्याने पहिल्या कसोटी सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर भारतीय संघाने हा सामना 113 धावांनी जिंकला होता.
तिसर्या कसोटीपूर्वी कोहलीने सांगितले होते की, वेगवान गोलंदाज सामन्यासाठी तंदुरुस्त नाही आणि तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. कोहली म्हणाला होता, सिराज गेल्या सामन्यातील दुखापतीतून सावरत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तो फिट होईल असे मला वाटत नाही.
सिराज हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील कोहलीचा सहकारी देखील आहे. कोहली कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर मंगळवारी 27 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर एक भावनिक संदेश पोस्ट केली. सिराजने लिहिले, "तुम्ही माझे सुपरहिरो आहात आणि मी तुम्हाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. तुम्ही नेहमीच माझे मोठे महान भाऊ आहात. इतक्या वर्षात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी कर्णधार किंग कोहली राहणार. कोहली आता 19 जानेवारीला पार्ल येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत फलंदाज म्हणून खेळणार आहे.
हेही वाचा : Badminton Competition: श्रीकांत, लक्ष्य यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीयमधून घेतली माघार