मुंबई - क्रीडा क्षेत्रात 'भारतरत्न' पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडूलकरचे असंख्य फॅन्स आहेत. प्रत्येक फॅन सचिनला क्रिकेटचा देव म्हणतो. मात्र मुंबईत राहणारा एक असा जबरा फॅन आहे. ज्याने सचिनचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अभिषेक साटम असे या फॅन्सन नाव आहे.
दरवर्षी सचिनला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देणाऱ्या अभिषेक साटम याने यावर्षी तब्बल तीस हजार कागदी टिकल्यांचा वापर करून सचिनचं अनोख पोट्रेट साकारले. यात त्यांना सहा रंगछटा देखील वापरले आहेत. यंदा एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकून भारताला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. याच वेळी भारतीय क्रिकेट संघाने सचिनला खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडियममध्ये एक फेरफटका मारला होता. या घटनेचे चित्र अभिषेक साटम यानं यंदा साकारलं आहे.
हेही वाचा - B'day Special: 'ईटीव्ही भारत'चा सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास आढावा
हेही वाचा - MI VS PBKS : पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्सने विजय