हैदराबाद: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलचा पंधरावा हंगाम खेळला जात आहे. आयपीएल 2022 चा हंगाम अतिशय शानदार पद्धतीने पार पडत आहे. आयपीएलमधील रोमांचक सामने क्रिकेट प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2022 चा अर्धा हंगाम पूर्ण झाला आहे. आयपीएलमध्ये तीन संघ चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत त्यांचे प्लेऑफमध्ये जाणे जवळपास निश्चित दिसत आहे.
गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) संघ - आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल 2022 मध्ये संघाने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. या संघाचे नेतृत्व स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या करत आहे. तो गोलंदाजीत खूप चांगले बदल करतो. हार्दिकने बॅटनेही कमाल दाखवली आहे. त्याने सात सामन्यांत 295 धावा केल्या आहेत. संघाकडे शुभमन गिलसारखा सलामीवीर आहे, ज्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. मधल्या फळीत त्याच्याकडे डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहरसारखे फलंदाज आहेत. अशा स्थितीत हा संघ प्लेऑफमध्ये पहिले स्थान मिळवू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघ - आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली होती. या संघाला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने दणदणीत पुनरागमन करत पुढील पाच सामने जिंकले. हैदराबादची गोलंदाजी खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे उमरान मलिक, अब्दुल समद आणि टी नटराजनसारखे गोलंदाज आहेत. त्याच्याकडे डेथ ओव्हर्ससाठी भुवनेश्वर कुमार आणि रोमॅरियो शेफर्ड आहेत. हैदराबादही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघ - आयपीएल 2022च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा दावेदार राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे दहा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या संघाकडे ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल आणि जोस बटरलसारखे दमदार खेळाडू आहेत. ज्यांनी गोलंदाजी आणि पलंदाजीमध्ये सुद्धा छाप पाडली. युझवेंद्र चहल पंधराव्या हंगामातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली आहे, तर जोस बटलरने तीन शतके झळकावली आहेत.
मुंबई आणि चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण - आयपीएल 2022 मध्ये असहाय मुंबई इंडियन्सची स्थिती खुप खराब राहिली आहे. यंदा मुंबईने सलग आठ सामने गमावले आहेत. संघ अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबईला 36 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई संघासाठी बऱ्यात खेळाडूंनी अतिशय खराब प्रदर्शन केले आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्सची गणना केली जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्जनेही सहा सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईबरोबर चेन्नईलाही प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे.
हेही वाचा - IPL 2022 RCB vs RR : यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आरसीबी आणि आरआर आमने-सामने; राजस्थान बदला घेण्यासाठी सज्ज