मुंबई - भविष्यात क्रिकेटमध्ये निर्णय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव असेल, असे मत भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे. कोणताही खेळाडू डेटा इंटेलिजेंसच्या वापराला नकार देऊ शकत नाही, असे देखील कुंबळे म्हणाले.
कुंबले यांनी डीआरएसचे उदाहरण देताना सांगितलं की, कसे या तंत्रज्ञानामुळे निर्णय प्रकिया बदलली आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा डीआरएस नव्हता, तेव्हा मैदानातील पंचाचा निर्णय अंतिम मानला जात होता.
अनिल कुंबळे म्हणाले की, क्रिकेटमध्ये डीआरएसचा प्रभाव आहे आणि मला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात निर्णय प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव वाढेल. यासाठी खेळाडूंची स्विकृती देखील महत्वाची आहे. नाहीतर आपण मागे पडू.
दरम्यान, या विषयावर दोन गट पडले आहेत. याविषयावरून चर्चा रंगत आहेत. याचे स्वागत अनिल कुंबळे यांनी केलं. तसेच त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य असल्याचे मत देखील मांडले.
अनिल कुंबळे याविषयी म्हणाले, हा सोपा मार्ग आहे पण मला वाटतं की, जर आपल्याला खेळाला अधिक चांगले करायचे असेल तर सद्याचे तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, नाहीतर आपण मागे राहू. मला वाटत नाही की, फक्त ब्रॉडकास्टर्स खेळात तंत्रज्ञानाचा वापर करतील. याशिवाय अनेक बोर्ड देखील नवनविन तंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न करतील. आता ओटीटी प्लेटफॉर्म येण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
हेही वाचा - Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द झाल्याने टीम इंडियावर भडकला जेम्स अँडरसन, म्हणाला...
हेही वाचा - IPL 2021 : यूएईत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट धोकादायक ठरतील, दिग्गजाची भविष्यवाणी