ETV Bharat / sports

IND v WI 3rd T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा सामना ; भारताकडे वेस्ट इंडिजला क्लीन स्विप देण्याची संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( IND v WI ) संघात टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (20 फेब्रुवारी ) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताकडे सामना जिंकून वेस्ट इंडिजला क्लीन स्विप देण्याची संधी असणार आहे.

author img

By

Published : Feb 20, 2022, 2:51 PM IST

IND v WI
IND v WI

हैदराबाद - सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहे. तसेच या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (20 फेब्रुवारी ) खेळला जाणार आहे. या अगोदर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी ( India leads the series 2-0 ) घेतली आहे. भारताला तिसरा सामना जिंकून वेस्ट इंडिजला क्लीन स्विप देण्याची संधी असणार आहे.

भारत वेस्ट इंडिज संघातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा टी-20 सामना ( IND v WI 3rd T20I ) रविवारी (20 फेब्रुवारी) होणार आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्याला ठीक सात वाजता सुरुवात होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यासाठी माजी कर्णधार विराट कोहली उपलब्ध असणार नाही ( Virat Kohli is not available ).

कारण तो भारतीय संघाच्या बायो-बबल पासून वेगळा होऊन घरी परतला आहे. तो सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने, त्याला टी-20 विश्वचषक समोर ठेवत त्याला विश्रांती देण्यात आली ( Rested Virat Kohli ) आहे. त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यात रुतुराज गायकवाडला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली ( Opportunity for Ruturaj Gaikwad ) जाऊ शकते.

आतापर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज संघात टी-20 मालिकेतील ( India and West Indies T20 series ) दोन सामने पार पडले आहेत. हे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. यापैकी पहिला सामना भारताने 16 फेब्रुवारीला 6 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना 18 फेब्रुवारी खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 8 धावांनी विजय मिळवला आहे. आज तिसरा सामना होणार आहे.

संभाव्य भारतीय प्लेईंग इलेव्हन ( Probable Indian playing XI ) -

रोहित शर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर/शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव, रवी बिश्नोई

संभाव्य वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन ( Probable West Indies playing XI ) -

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.