ETV Bharat / sports

Team India Black Armband : इंग्लंडविरुद्ध सामन्यात हातावर काळ्या पट्टी बांधून भारतीय संघ मैदानात; 'हे' आहे कारण

Team India Black Armband : वर्ल्ड कप 2023 सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ काळी पट्टी हातावर बांधून मैदानात उतरला आहे. मात्र, हातावर काळी पट्टी बांधण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर बातमी...

Team India Black Armband Vs Eng
Team India Black Armband Vs Eng
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 6:05 PM IST

लखनौ Team India Black Armband : भारतीय संघ आज (29 ऑक्टोबर) लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आहे. भारतानं विश्वचषकातील आतापर्यंतचं पाचही सामने जिंकले असून या सामन्यात विजयाची दुहेरी हॅट्ट्रिक करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यात टीम इंडिया काळी पट्टी हाताला बांधून मैदानात उतरली आहे.

'या' कारणानं बांधली काळी पट्टी : भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचं नुकतंच निधन झाल्यानं भारतीय क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियानं हाताला काळी पट्टी बांधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या घोषणेमध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) लिहिलं की, "इंग्लंडविरुद्धच्या आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्यात, भारतीय संघ बिशनसिंग बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हाताला काळी पट्टी बाधणार आहे."

बिशनसिंग बेदी भारताचे सर्वोतम गोलंदाज : भारताचे महान माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचं सोमवारी (२३ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं होतं. बेदी यांची भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये गणना होत होती. त्यांनी 67 कसोटी सामन्यात 266 बळी घेतले होते. बेदी यांनी भारतासाठी 1966 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. 1979 मध्ये बेदी यांनी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup २०२३ : रोहित-राहुलनं भारताचा डाव सांभाळला; वाचा स्कोर
  2. Cricket world cup 2023 IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध नाणेफेकीला येताच रोहित शर्माचं होणार अनोख शतक; काय असू शकते दोन्ही संघांची रणनिती?
  3. Ajay Ratra Interview : पंड्याला दुखापत झाल्यानं रोहित-विराटनं एकत्र विश्वचषकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका निभवावी : अजय रात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.