ETV Bharat / sports

Taniya Bhatia Robbed in London : लंडनमध्ये महिला क्रिकेटपटू तानिया भाटियाच्या साहित्याची झाली चोरी - Tania Bhatia Latest News

लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये संघाच्या मुक्कामादरम्यान विकेटकीपर तानिया भाटियाच्या ( Wicketkeeper Tania Bhatia ) साहित्याची चोरी झाली आहे. तानियाने ट्विट करून ही माहिती दिली. भारतीय महिला संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा शानदार विजय नोंदवला. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.

TANIYA BHATIA
तानिया भाटिया
author img

By

Published : Sep 27, 2022, 12:13 PM IST

नवी दिल्ली: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटियाने ( Wicket keeper batsman Tania Bhatia ) सोमवारी दावा केला की, लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये महिला संघाच्या मुक्कामादरम्यान रोख रक्कम, कार्ड आणि दागिन्यांसह त्यांचे महत्त्वाचे सामान लुटले ( Taniya Bhatia robbed in London ) गेले. याबाबत तानियाने भारतात परतल्यानंतर ट्विट करुन माहिती दिली. भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा शानदार विजय नोंदवला. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.

तानियाने ट्विटरवर लिहिले की, 'मॅरियट हॉटेल लंडन ( Marriott Hotel London ) मॅडा वेलेच्या व्यवस्थापनामुळे धक्का बसला असून निराशा आली. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू म्हणून माझ्या नुकत्याच वास्तव्यादरम्यान कोणीतरी माझ्या खोलीत प्रवेश केला आणि रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह माझी बॅग चोरीला गेली. त्यामुळे असुरक्षित.' इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ( ECB ) ट्विटर हँडलला टॅग करत तिन आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'या प्रकरणाचा जलद तपास आणि निराकरणाची आशा आहे. ईसीबीच्या पसंतीच्या हॉटेल पार्टनरमध्ये सुरक्षिततेचा अभाव आश्चर्यकारक आहे. तेही दखल घेतील अशी आशा आहे.

  • 1/2 Shocked and disappointed at Marriot Hotel London Maida Vale management; someone walked into my personal room and stole my bag with cash, cards, watches and jewellery during my recent stay as a part of Indian Women's Cricket team. @MarriottBonvoy @Marriott. So unsafe.

    — Taniyaa Sapna Bhatia (@IamTaniyaBhatia) September 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

24 वर्षीय महिला खेळाडूच्या तक्रारीवर हॉटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया देताना लिहिले, 'तानिया, आम्हाला हे ऐकून वाईट वाटले. कृपया तुमचे नाव आणि ईमेल पत्त्याशिवाय तुमचे आरक्षण तपशील सामायिक करा, जेणेकरून आम्ही त्याचा तपास करू शकू.' भारताने 10 ते 24 सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडमध्ये तीन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळले. तानिया भारतीय महिला वनडे संघाचा भाग होती.

हेही वाचा -Deepti Sharma Break the Silence : 'मंकडिंग' वादावर दीप्तीने सोडले मौन, म्हणाली- आम्ही चार्ली डीनला दिला होता इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.